सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २४ मधील भुखंड क्रमांक १ वरील महापालिकेच्या उद्यानातील जंगली गवत काढणेबाबत व उद्यानातील नादुरूस्त, बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरूस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
जुईनगर सेक्टर २४ मधील भुखंड क्रमांक १ वर महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणावर जंगली गवत वाढले असून यामुळे उद्यानाला बकालपणा आला आहे. उद्यानात येणाऱ्या रहीवाशांना नाग-सापही गवतात दिसले असल्याने उद्यानात येणाऱ्या रहीवाशांना सर्पदंश होण्याची भीती आहे. गवत काढल्यास उद्यानात वावरताना रहीवाशांना भीती वाटणार नाही. उद्यानातील पथदिवेही बंद पडले असून त्यामुळे सांयकाळनंतर उद्यानात अंधार पसरतो. उद्यानात येणाऱ्या मुली, महिला, ज्येष्ठ नागरिकांबाबत काही गैरप्रकार घडण्याचीही भीती आहे. आपण समस्येचे गांभीर्य पाहता उद्यानातील जंगली गवत काढून टाकण्याचे तसेच उद्यानातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.