सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावाचा समावेश होत आहे. गेल्या एक महिन्यापासून नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पाऊस पडत असल्याने पदपथावर शेवाळ साचून पदपथ निसरडे होण्यास सुरूवात झाली आहे. चार-पाच दिवसात पदपथावरून ज्येष्ठ नागरिक व महिला घसरून पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे कोणाला मोठी दुर्घटना होवून दुखापत होणे अथवा हात-पाय फ्रॅक्चर होणे अशी दुर्घटना घडण्याअगोदर पदपथावर पालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथ चालण्यायोग्य करणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात आणि सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे आपण संबंधितांना निर्देश देवून सारसोळे गावातील ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.