नवी मुंबई : नेरूळ विभागातील शिरवणे गावात सेक्टर १अे अंतर्गत जलवाहिनी टाकणे हे ४ कोटी ६ लाख २९ हजार १४१ रूपयांचे टेंडर मे. ओम साई कंन्स्ट्रकशन या कंपनीला दिले आहे. हे काम अंत्यत निकृष्ठ दर्जांचे होत असल्याने या कामाची तातडीने प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला हे काम दिले आहे. हे काम मिळण्यापासून ते काम सुरू असलेले सर्वच नियमबाह्य प्रक्रियेतून सुरू आहे. काम करतानाही बेकीफिकिरपणा दाखवत निकृष्ठ दर्जाचे काम सुरू आहे. काम मिळविण्यासाठीच सादर केलेल्या कागदपत्रांचीही प्रशासनाकडून छाननी होणे आवश्यक होते. तथापि हे काम देण्यासाठी राजकीय घटकांनी प्रशासनावर दबाव आणल्याने पात्र नसतानाही नियमबाह्यरित्या या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. याचीही नव्याने चौकशी होणे आवश्यक आहे. कामाचे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही काम कसे देण्यात आले? कागदपत्रांची छाननी करताना गांभीर्य का दाखविण्यात आले नाही. महापालिका प्रशासन नवी मुंबईकरांसाठी काम करत आहे का राजकारण्यांच्या व ठेकेदारांच्या मर्जी संपादनासाठी काम करत आहे. या कामाबाबत यापूर्वीही लेखी तक्रारी काही लोकांनी करूनही प्रशासनाने कामासंदर्भात चौकशी करण्यास चालढकलच केलेली आहे. काम करताना जी काळजी घ्यावयास हवी आहे, ती घेतली जात नसून केवळ खोदकाम करून जलवाहिन्या गाडण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.