नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४ तसेच जुईनगर नोडमधील बंद पडलेले पथदिवे आणि धोकादायक अवस्थेतील गटारावरील झाकणे त्वरीत बदली करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २ आणि ४ तसेच जुईनगर नोडमध्ये अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने सांयकाळनंतर अंधार होतो. सध्या गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजविघातक शक्तींपासून महिलांना, मुलींना छेडछाड अथवा अन्य दुर्घटनेची भीती आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची लुटमार होण्याची शक्यता आहे. याशिवाय पदपथावर असलेले तसेच रस्त्यावर असलेल्या बंदीस्त गटारांवरील असलेली झाकणे काही ठिकाणी तुटलेली आहे तर काही ठिकाणी वाकलेली तसेच दबलेली आहेत. या धोकादायक झाकणावरून वाहन गेल्यास अथवा रहीवाशांचा रात्रीच्या अंधारात पाय पडल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. आपले कर्मचाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना बंद पडलेले पथदिवे तसेच धोकादायक अवस्थेत असलेली गटारावरील झाकणे आणून देवू. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना नेरूळ सेक्टर २ आणि ४ तसेच जुईनगर नोडमधील बंद पडलेले पथदिवे आणि धोकादायक अवस्थेतील गटारावरील झाकणे त्वरीत बदली करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.