Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सानपाडा व जुईनगर नोडमध्ये अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर शेवाळ साचले आहे. रहीवाशी पदपथावरून घसरुन पडू लागले आहेत. रहीवाशी जायबंदी झाल्यावर पालिका प्रशासन पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करणार आहे काय? असा प्रश्न भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका लेखी विचारला आहे.
नवी मुंबईत गेल्या दोन महिन्यापासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जुईनगर व सानपाडा नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर शेवाळ साचण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस अजून पाच-सहा सतत राहील्यास हे शेवाळ वाढून पदपथ निसरडे होण्याची शक्यता आहे. पदपथ निसरडे झाल्यास त्यावरून ये-जा करणारे महिला-पुरूष, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक चालताना घसरून पडण्याची व त्यांना दुखापत होण्याची भीती आहे. समस्या निर्माण होण्यापूर्वी व त्या समस्येमुळे इतरांना त्रास होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने सानपाडा व जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथावर शेवाळ साचणार नाही, याची काळजी घ्यावी की जेणेकरून लोकांना पदपथावरून ये-जा करताना त्रास होणार नाही. यापूर्वी १० जुलै २०२३ रोजी आपणास या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. आपणही समस्येचे गांभीर्य पाहता तात्काळ समस्या निवारणासाठी निवेदन संबंधितांना फॉरवर्ड केले होते. पंरतु त्यांनी आजतागायत काहीही कार्यवाही झालेले नाही. पदपथावरून महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले घसरून पडून त्यांना दुखापतीही झाल्या आहेत. पालिका प्रशासन कोणाची यायबंदी होण्याची वाट पाहत आहे काय? त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता आपण जुईनगर व सानपाडा नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याचे आपण संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.