अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांची महापालिकेकडे मागणी
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील कुरनाड (पाबलचा खोरा) या ठिकाणी शासनाकडून धरण नियोजनाचे काम सध्या प्रगतीपथावर असून भविष्यातील नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवी मुंबई महापालिकेने महाराष्ट्र शासनाशी यासंदर्भात पाठपुरावा करून सदरचे नियोजित धरण हे नवी मुंबई महापालिकेकडे घेण्यासाठी योग्य ती तरतूद करावी अशी मागणी माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वमालकीचे मोरबे धरण असून या धरणातून नवी मुंबईकरांना २४ तास दररोज ४५० एमएलडी पारणी पुरवठा केला जात आहे. नवी मुंबई शहराची वाढत्या लोकसंख्येचे प्रमाण तसेच पंतपधान आवास योजना, सिडकोनिर्मित जुन्या इमारतीचे पुर्नबांधणी, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी बांधकामे व एमआयडीसी क्षेत्रात वाढती झोपडपडी, औद्योगिक क्षेत्रातील जागांवर निर्माण होणाऱ्या टोलेजंग निवासी इमारती यासाठी अतिरिक्त पाणी लागत आहे. भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, मोरबे धरणामधून होणारा पारणीसाठा आपत्या नवी मुंबईतील नागरिकांना कमी पड़ेल यासाठी महापालिकेने अतिरिक्त पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यावर व पर्यायी नर्वीन पाण्याचे स्त्रोत शोधणे बाबत लक्ष केंद्रीत केलेले आहे. ही प्रशंसनीय बाब आहे. याबाबत महापालिकेच्या दुरदृष्टीपणाचे कौतूक करावे तेवढे कमी आहे. त्यासाठी महापालिकेने रायगड जिल्ह्यातील टाटा पॉवरच्या भिरा हायड़ो इलेक्ट्रीक प्रकल्पातूनअंवा आणि कुंडलिका नदीतून वाहून जाणारे ८०० एमएलडी पाणी मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुध्दी केंद्रापर्यत खेचून आणण्याची योजना आहे. परंतु समस्या अशी आहे की, दररोज ८00 एमएलडी पाणी साठविण्यासाठी आपत्याकडे पर्यायी स्टोरेज व्यवस्था आहे का? एवढ़े पाणी साठविण्याची क्षमता भोकरपाडा जलशुध्दी केंद्रामध्ये आहे का? तसेच तांत्रिकदृष्टया भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र यासाठी सक्षम आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
जर रायगड जिल्हयातील टाटा पॉवरच्या भिरा हायड़ो इलेक्ट्रीक प्रकल्पाचे पाणी मोरबे धरणापर्यत पाईप लाईनद्वारे आणण्याचे ठरविले तर त्यासाठी भूसंपादन करण्याचा प्रश्न निर्माण होतो. स्थानिकांच्या सर्व कायदेशीर बाबींचा सोपस्कार पूर्ण करावा लागेल. या सर्व खर्चिक वाबी आहेत. तसेच हे पाणी मोरबे धरणामध्ये साठविष्यासाठी धरणाची उंची वाढवावी लागेल व त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत बदल होईल. तसेच धरणाच्या क्षेत्रात आजूबाजूला असणाऱ्या डोंगर दऱ्यातून येणारे पाणी, पावसाचे पाणी याचा दाब धरणावर पडू शकतो. यामुळे धरणाच्या सरंरचनेला धोका निर्माण होऊन धरणाची भिंत ढासळण्याची व मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर रायगड जिल्ह्यातील टाटा पॉवरच्या भिरा हायडो इलेक्ट्रीक प्रकल्पाचे पाणी त्याच ठिकाणी मोठ्या स्टोरेज टेंक उभारून गुरूत्वाकर्षणात्वाने रायगड जिल्हयातील पेण तालुक्यातील कुरनाड (पाबलचा खोरा) या ठिकाणी शासनाच्या नियोजित धरणामध्ये आणल्यास तेथील जलशुध्दीकरण केंद्रातुन पाईपलाईनद्वारे वडखळ मार्गे बेलापूरपर्यत आणला जाऊन नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा होवू शकतो. तसेच जर हे धरण नवी मुंबई महापालिकेने घेतले तर त्या धरणातील पाणी आजूबाजूच्या परिसराला तसेच भविष्यात वड़खळ व नागोठणे पर्यत निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करून महापालिकेला महसूल मिळू शकतो. यापूर्वी मी नगरसेवक असताना महापालिका सभागृहात या संदर्भात दि. १९ सप्टेंवर २०१२ रोजी ठराव(विषय) क्रमांक. ३७ मंजूर करण्यात आलेला आहे. सदर नियोजित धरणाचे काम लवकरात-लवकर पूर्ण केल्यास रायगड जिल्हयातील टाटा पॉवरच्या भिरा हायड़्रो इलेक्ट्रीक प्रकल्पातून अंवा आणि कुंडलिका नदीतून वाहुन जाणारे ८०० एमएलडी पाणी साठविण्यासाठी पर्यायी स्टोरेज व्यवस्था मिळेल. तसेच नैसर्गिक स्त्रोताव्दारे उपलब्ध होणारे पाणी व टाटा पॉवरच्या भिरा हायड्रा इलेक्ट्रीक प्रकल्पाचे पाण्याचा साठा या धरणामध्ये झात्यास नवी मुंबई शहराची पाण्याची समस्या कायमची दूर होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाशी उपरोक्त विषयासंदर्भात संपर्क साधून व सदरचे नियोजित धरण नवी मुंबई महानगरपालिकेने घेण्यासाठी प्रयत्न व तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोट…
नवी मुंबई सोबतच सिडको प्राधिकरण पनवेल तसेच ठाणे, कल्याण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्या ही वाढणार आहे. याबाबीचा सर्वकष विचार करून भविष्यातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. २०१२ साली नवीन धरणाचा प्रस्ताव सभागृहात आला होता. त्याच्या सध्यास्तिथी बाबतची माहिती शासनाच्या जलसंपदा विभागाकडून लवकरच माहिती घेण्यात येईल. महापालिकेचे मोरबे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे मर्यादित असल्यामुळे गेल्या सात आठ वर्षात धरण पूर्णपणे भरून वाहण्याच्या घटना तीन ते चार वेळा झाल्यामुळे मोरबे धरणाची उंची वाढविण्याचा पर्याय तांत्रिक दृष्टया व्यवहार्य नाही. भिरा धरणामधून कुंडलिका नदीत सोडण्यात येणाऱ्या जलसाठ्याविषयी नवी मुंबई महापालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिका मार्फत नवी मुंबई क्षेत्रासाठी अतिरिक्त जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या तंज्ञ सदस्यांच्या समिती समोर पर्याय ठेवण्यात आलेल्या पर्यायाबाबत तांत्रिक व व्यावहारिक दृष्टीने सखोल अभ्यास करून योग्य तो पर्याय निवडण्यात येणार असल्याचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी सांगितले.