Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : मालमत्ता कर व पाणीदेयकाचा भरणा करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने गुगल पे, फोन पे, पेटियम आदि माध्यमाचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी समाजसेवक रविंद्र भगत यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
सध्याचा काळ हा ऑनलाईन पध्दतीने देयकांचा भरणा करण्याचा आहे. ऑनलाईन भरणा करण्याने वेळेचीही बचत होते. महापालिका प्रशासनाने मात्र अद्यापी ऑनलाईन पद्धतीवा अवलंब केलेला नाही. ऑफलाइन भरणा करण्यासाठी वेळेचा अपव्यय होतो. महापालिका कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना पाणीपट्टी व मालमत्ता कर भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्यायोगे पाणीदेयक व मालमत्ता कर देयक भरण्यासाठी लोकांना महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी महापालिकेत देयके भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम आदींचा वापर करण्याची सुविधा दिलेली आहे. आपणही त्या धर्तीवर नवी मुंबईकरांना देयके भरण्यासाठी अशी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. रविंद्र भगत हे महापालिका प्रशासनाकडे या मागणीसाठी २०२० पासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.