गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई हे आपले शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. तसेच शहरात मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी साफसफाई कर्मचारी हे आपले काम चोख पद्धतीने पार पाडत असतात. परंतु स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. शुक्रवारी याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका पालिका मुख्यालयाजवळ गेली ३ दिवस समाज समता कामगार संघ यांच्या विशिष्ट मागण्याकरिता आमरण उपोषणकर्त्यांची (साफसफाई कर्मचाऱ्यांची) भेट घेऊन त्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
तसेच त्यापुढे म्हणल्या की, सर्व साफसफाई कर्मचारी हे गोरगरीब व विविध समाजातील कर्मचारी असून ते आपआपले कर्तव्य बजावत आहेत व नवी मुंबई महानगरपालिकेला विसर पडला आहे की त्याच साफसफाई कर्मचाऱ्यांमुळे पालिकेला स्वच्छतेमध्ये पारितोषिके मिळत आहे व याच साफसफाई कर्मचाऱ्यांमुळेच नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. त्यामुळे साफसफाई कर्मचारी त्यांच्या न्यायाच्या हक्कासाठी गेली ३ दिवस उपोषणाला बसले असल्याचे समजताच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भेट घेतली. तसेच त्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आश्वासित केले की, नवी मुंबई महानगरपालिक आयुक्त राजेश नार्वेकर हे काही शासकीय कामाकरिता २ दिवस दौऱ्यावर असून ते कार्यालयात रुजू होताच पहिली बैठक ही समाज समता कामगार संघ साफसफाई कर्मचारी यांची असेल व त्यासाठी साफसफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा पूर्णपणे माझा प्रयत्न असेल. तसेच मी तुमच्या नेहमी सोबत असून तुम्हाला ठोक मानधन मिळविण्याचा ही प्रयत्न करेन. तसेच नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून सदरबाबत संपूर्ण माहिती दिली व त्याचबरोबर म्हसाळ यांनी सकारात्मकता दाखवत सदरचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, समाज समता कामगार संघ यांनी दिलेल्या पत्रामध्ये केलेल्या मागण्या जे कामगार सेवा निवृत्त झाले आहेत त्यांची सेवा उपदानाची रक्कम (ग्रॉच्युटी) त्वरित अदा करण्यात यावी, उद्यान विभागातील कामगारांची २०२० पासूनची विशेष राहणीमान भत्यातील थकबाकी कामगारांना त्वरित अदा करण्यात यावी अशा अनेक विविध मागण्यांचे निराकरण करून त्यावर तोडगा काढून दिवाळी अगोदरच साफसफाई कर्मचारी यांना गोड भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे समवेत समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड, समाज समता कामगार संघाचे अध्यक्ष (नवी मुंबई) गजानन भोईर, समाज समता कामगार संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटील, समाज समता कामगार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, समाज समता कामगार संघाचे उपाध्यक्ष सुभाष साळुंखे तसेच संघाचे पदाधिकारी व उपोषणकर्ते उपस्थित होते.