नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर या पालिकेच्या उद्यानात डासांचा उद्रेक नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. सानपाडा नोडमधील हे सर्वाधिक मोठे व विस्तिर्ण असे उद्यान आहे. सानपाडा नोडमधील रहीवाशी सकाळी व संध्याकाळी या उद्यानात मोठ्या संख्येने फिरावयास येतात, सोवत आपल्या घरातील लहान मुलांनाही उद्यानात खेळण्यासाठी घेवून येतात. या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उद्रेक वाढीस लागल्याने रहिबाशांना उद्यानात फिरणे व बसून गप्पा मारणे अवघड झाले आहे. उद्यानात येणाऱ्यापैकी अनेकांना या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू झाला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. उद्यानात पावसामुळे वाढलेल्या जंगली गवतामुळेही डासांना खतपाणी मिळत आहे. सर्वप्रथम उद्यानातील पावसामुळे वाढलेले जंगली गवत हटवावे. तसेच चार-पाच दिवस सलग सकाळ व संध्याकाळ उद्यानात धुरीकरण अभियान राबवावे आणि उद्यानासभोवताली असलेल्या गटारांमध्ये डासअळीनाशकांची फवारणी करावी. उद्यानात वाढलेल्या डासांचा उद्यानासभोवतालच्या गृहनिर्माण सोसायट्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या उद्यानात सलग काही दिवस धुरीकरण अभियान राबवून डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.