स्वयंम न्यूज ब्युरो : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : तळागाळातील जनतेची कामे केवळ कॉंग्रेस पक्षच करत असल्याने जनतेला कॉंग्रेसकडून खुप अपेक्षा आहे. प्रस्थापितांप्रती सर्वसामान्यांना केवळ दिशाभूलच होत असल्याचा अनुभव आल्याने तळागाळातील वर्ग पुन्हा कॉंग्रेसकडे वळू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि कॉंग्रेस यामध्ये थेट सुसंवाद असण्यासाठी प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केले.
जुईनगर सेक्टर २३ येथे कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे रविंद्र सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले, जुईनगर व नेरुळ मध्ये हे काँग्रेसचे चौथे जनसंपर्क कार्यालय आहे यावेळी ते बोलत होते.
जुईनगर सेक्टर २३ येथे जुईनगर विभाग अध्यक्ष महानंद रामराजे आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे सचिव आबा सोनावने यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर काँग्रेस जनसंपर्क कार्यालय चालू केले. यावेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर, प्रभाग ८६चे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे, कॉंग्रसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पिंटो अंकल, गणेश इंगवले, उत्तम पिसाळ, रोहन इंगवले, भानुदास शिंदे, तानाजी जाधव ,सुनील पगारे ,भगवान डोळस, राजेंद्र चौरासिया, शिवाजी माने, श्रीरंग कुंभार, अंकुश कदम, प्रकाश बनसोडे, बाळू धडेल, श्रीरंग वारंग, पंडित जावळे, रमेश अहिरे, नरसिंह मामाडी, लक्ष्मण गायकवाड, सीमा वाघ, रेश्मा पवार, पूनम साळुंके, सुनिता क्षिरसागर, स्वप्निल सोरटे, संग्राम इंगळे व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.