सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राजकारणामध्ये जसा राजा श्रेष्ठ असतो, तसे या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राणी श्रेष्ठ असते. तसेच राणी सर्व चोहो बाजूने घर फिरू शकते पण राजा फक्त एकच पाऊल चालतो. तसेच उंटाला, घोड्याला व प्याद्याला जेवढा अधिकार आहे तेवढा राजाला नसतो म्हणून या सर्व घराची श्रेष्ठ ही राणी मानली जाते तसे या बेलापूर मतदार संघात श्रेष्ठ कोण आहे ती राणी आहे, असे उदगार बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी काढताच जमलेल्या सर्व लहान थोर नागरिकांनी टाळ्यांचा गजरात आनंद व्यक्त केला.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘नमो चषक २०२४’च्या सीवूडस येथील ओरीयन टॉवर, प्लॉट नं. १२० च्या मैदानात झालेल्या कॅरम व बुद्धिबळाच्या स्पर्धेचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे या प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुढे म्हणाल्या की, सदरचा उद्घाटन हा माजी नगरसेवक दिपक पवार यांच्या विभागात झाला असून या स्पर्धेच्या आयोजनाचे काम त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत घेऊन आज लहान विद्यार्थी तसेच विद्यार्थींनीना कॅरम व बुद्धिबळाच्या स्पर्धेचे प्रोत्साहन देऊन त्यांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलेला आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संपूर्ण देशात ‘नमो चषक २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, कालच सीवूडस येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानात भव्यदिव्य असा फुटबॉलची स्पर्धा पार पडली आणि आज कॅरम व बुद्धिबलाची स्पर्धा होत आहे. आपणास ठाऊक असेल की बुद्धीबळ हा खेळ आपल्या बुद्धीला चालना व बुद्धीचा आत्मविश्वास वाढविणारा हा खेळ आहे. जर या खेळामध्ये पाहिले तर हा ‘राजकारणी’ लोकांचा खेळ आहे.
इथे कितीही उंट, घोडे आडवे आले ना त्यांना पाडायची क्षमता आमच्यात आहे आणि या बुद्धिबळाच्या खेळातून आम्ही इथे दाखवून दिलेला आहे. तसेच कॅरम या खेळालासुद्धा एक फार एकांतिका लागते की त्यांनी एकदम आत्मविश्वासाने कॅरम खेळायचा असतो, तेव्हा समोरचा प्रतिस्पर्धक हा किती गुणांनी सोंगटी मारतो आणि राणी कोण जिंकतो हे महत्वाचे असते. तसेच हा खेळ खेळतांना या मुलांबरोबर व महिलांबरोबर खूप मला आनंद झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या खेळाची नोंदणी ही जवळ जवळ दिलेल्या लिंकवर अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद येत आहे आणि पुढचे खेळ हे असच चालू राहणार आहेत. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सदरची नोंदणी ही ५० हजार झालीच पाहिजे असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे बेलापूर मतदारसंघात https:namochasak.in या लिंकवर नाव नोंदणी व खेळ हे सुरूच राहणार आहेत.
तसेच या दिलेल्या लिंकवर झालेली नोंद ही ग्राह्य धरण्यात येणार असून यात कुठल्या आमदारांनी किती नोंदणी केली आहे याची संपूर्ण माहिती ही भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. सदर या लिंकमुळे बनावट नोंदणीवर आळा बसणार आहे. तसेच आपापल्या विभागात कोण विकास कामे करीत आहेत आणि पक्षांनी दिलेला नमो चषक हा कार्यक्रम होऊ नये म्हणून प्रसारमाध्यमांच्या पाठीमागे यंत्रणा लावणे असे कृत्य बेलापूर मतदारसंघात सुरु आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मला सांगावयास आनंद होते की, काल सीवूडस येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये बेलापूर मतदारसंघातून जवळ जवळ ६०० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. तसेच विजेत्या संघांनी आपल्या हातात नमो चषक घेऊन त्यांचे पालक, प्रशिक्षक, शिक्षक यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्यामुळे त्यांचा आनंद हाच आमचा आनंद असे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. तसेच एकंदरीत बेलापूर मतदार संघात १० दिवस विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नवी मुंबईकरांना पहावयास मिळणार आहे.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, सुरेश राणा, विनय तांबे, रुपेश चव्हाण, प्रकाश पालांडे, धीरज नोतानी, सी.जी. भावेली, दिपक धोहराणी, दिनेश बांगर, अमित धरजले, मनाली रणदिवे, लताशा गरिमा, हेमा, श्वेता, सुनिता, गरिमा, रमणी टी. स्नेहा, कांचन तसेच असंख्य विद्यार्थी व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.