आदरणीय नरेंद्र मोदीजी
पंतप्रधान
भारत सरकार
मी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील पिंपळगावचा एक ग्रामस्थ. मराठा समाजाचा शेतकरी. संदीप खांडगेपाटील माझे नाव. आमच्या गावामध्ये अधिकृत तीन रस्ते असताना व भुसंपादन झालेले असतानाही माझ्या शेतातून भूसंपादन न करता, कोणतीही पूर्वसूचना न देता जिल्हा परिषद स्थानिक गाव पुढाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल ४२ गुंठे शेतावर वेळोवेळी अतिक्रमण करत आहे. आताही पुन्हा अतिक्रमणाची जोरदार तयारी सुरू आहे. वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात लेखी पाठपुरावा करतोय. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनीही मंत्री गिरीश महाजन यांना लेखी पत्र देवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. न्यायालयात आमचा परिवार दाद मागतोय. खटला सुरु आहे. गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य खटला आम्ही हारल्याची अफवा सोशल मिडीयावर (यूट्यूब) सोडून अतिक्रमण करत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याच कार्यालयातील आमच्या गावात काम करणारा एक घटक पडद्याआडून यात महत्वाची भूमिका बजावत असल्याने विनाभूसंपादन, कोणतीही पूर्वसूचना न देता, एक पैशाचाही मोबदला न देता आमच्या शेतातील ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण होत आहे. आताही अतिक्रमणावर डागडूजी करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मंत्रालय पातळीवर अनेक समाजसेवकांनी लेखी पाठपुरावा करून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडे निवेदने फॉरवर्ड करण्याशिवाय काहीही कार्यवाही नाही. या अतिक्रमणाचा धसका घेवून माझे वडीलांचे हदयविकाराच्या झटक्याने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले आहे. शेतावर विनाभूसंपादन, कोणतीही पूर्वसूचना न देता, एक पैशाचाही मोबदला न देता शासकीय अतिक्रमण ४२ गुंठेवर झाले आहे व आता पुन्हा डागडूजीचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासन साथ देत नाही. वडील मी गमविले, माझे चुलते आताच वाशीतील फोर्टिज रुग्णालयात एक महिना उपचार घेवून आले आहेत. त्यांना चालता येत नाही. शेतातील शासकीय अतिक्रमणामुळे आमच्या दोन घरांची वाताहत झाली आहे. आपण याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना निर्देश द्या. आमच्या शेतातील अतिक्रमण काढा. शेताची व घराची वाताहत झाली आहे. आम्ही अनाथ व पोरके झालो आहोत. या अतिक्रमणामुळे आमच्या घरावर शोककळा पसरली असून माणसे गमवावी लागली आहेत. गावच्या सरपंचाच्या घराजवळून अधिकृत रस्ता आहे. कागदोपत्री नोंद आहे. भूसंपादनही झालेले आहे. असे असताना गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद अधिकारी आमच्याच शेतावर अतिक्रमण करत आहेत. मोदींजी आम्हाला न्याय हवाय. न्याय देता येत नसेल तर भविष्यात यामुळे आमच्या घरातील एक एक सदस्य नदीवर जाईल, त्यावेळी तरी गिरीश महाजनांना अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी पिंपळगावला पाठवा, ही नम्र विनंती.
आपला नम्र
संदीप खांडगेपाटील
८३६९९२४६४६
sandeepkhandgepatil@gmail.com
८३६९९२४६४६
sandeepkhandgepatil@gmail.com