मुंबई : विनाभूसंपादन शेतामध्ये थेट ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण करणाऱ्या कंत्राटाची चौकशी करणेबाबत, २०२१-२२चे काम , कामाचा कालावधी ९ महिने असतानाही अजूनही काम सुरू असलेबाबत, अतिक्रमणावर हा ठेकेदार लवकरच डांबरीकरण करणार असल्याने कामास विंलब तसेच विनाभूसंपादन शेतातील ४२ गुंठे जागेची नासाडी करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याचा जेसीपी जप्त करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी एमआयएमचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई प्रभारी, एमआयएम विद्यार्थी आघाडी , महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महसूल विभागाचे सचिव डॉ. राजगोपाल देवरा, गृह विभागाच्या सचिव सुजाता सौनिक, सचिब एकनाथ ढवळे यांच्या कडे केली आहे.
या निवेदनाबाबत ठेकेदाराने शेताच्या बाजूला लावलेला फलकही माहितीस्तव एमआयएमच्या शाहनवाझ खान यांनी जोडला आहे.
निवेदनामध्ये हाजी शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर रोडवरील पिंपळगाव फाटा, एसटीस्थानकातून गावात जाणारा रस्ताच अनधिकृत आहे. गावातून जुन्नरला जाण्यासाठी वऱ्हाडी मळ्यातून गावच्या सरपंचाच्या गराजवळून जाणारा रस्ता अधिकृत आहे. या रस्त्याची कागदोपत्री नोंद आहे व भूसंपादनही झालेले आहे. तथापि हा अधिकृत रस्ता असतानाही जिल्हा परिषद, गावचे पुढारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी पोलीसी पाठबळावर ३० मे २०२३ पासून पुन्हा कै. उत्तम विष्णू खांडगे व चंद्रकांत विष्णू खांडगे यांच्या शेतातील नारायणगाव-जुन्नर रोडवरील गट क्रमांक ३०८/१ शेतात अतिक्रमण झाले असून कोणत्याही प्रकारचा मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. २०१३-१४ सालीही धाकधपटशा व दंडेलशाहीच्या बळावर प्रशासनाने या दोन भावाच्या शेतात अतिक्रमण करून पायवाटेचे मोठ्या रस्त्यात रूपांतर करून डांबरीकरण केले होते. या रस्त्याची कोठेही प्रशासन दरबारी नोंद नाही. गावात तीन शासकीय रस्ते याअगोदरच नारायणगाव –जुन्नरला उपलब्ध असून या दोन शेतकऱ्यांच्या जमिनित काही घटकांनी दडपशाही करून या आमच्या तब्बल ४२ गुंठे जमिनीचे नुकसान करण्यात आलेले आहे. भूसंपादन केले नसल्याची कबुली प्रशासन देत आहे. माझे वडील व चुलते हे दोघे शेतकरी बंधू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयीन पातळीवर संघर्ष करत आहेत. भूसंपादन नाही, शेतकऱ्यांना मोबदला नाही. कागदावर या रस्त्याची नोंद नाही. सर्व बेकायदेशीर असतानाही या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुन्हा एकवार जिल्हा परिषद डागडूजी करत असल्याचा प्रकार शाहनवाझ खान यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले आहे.
नारायणगाव-जुन्नर रोडवरील १) उत्तम विष्णू खांडगे २) चंद्रकांत विष्णू खांडगे यांच्या पाच एकर जमिनीवर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी व ठेकेदार यांनी भूसंपादन न करता पोलीसी ताकदीवर डांबरी रस्ता बनविला आहे. विना भुसंपादन पोलिसी पाठबळावर गावच्या पुढाऱ्यांनी दमदाटी करत आमच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे शेतावर अतिक्रमण केले आहे. या दोघा शेतकऱ्यांचे वडील कै. विष्णू भागोजी खांडगे यांनी १९६५ ला जमिन विकत घेतली, त्यावेळी कागदावर रस्ता नव्हता व आजही कागदावर रस्त्याची नोंद नाही. या शेताचे सरकारने आजतागायत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केलेले नाही. शेतकऱ्यांना एक पैशाचाही मोबदला न देता गावचे पुढारी दहशतीच्या बळावर या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे अतिक्रमण करत आहेत. गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे या दोन शेतकरी परिवाराचे मानसिक संतुलन ढासळले आहे. यातील एक शेतकरी माझे वडील कै. उत्तम विष्णू खांडगे यांचे गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे आणि शेतात विनाभूसंपादन पोलीसी पाठबळावर व सोशल मिडियावर सरपंच व ग्रामसेवल खोटी माहिती देवून गावाची दिशाभूल करत असल्याने दहशतीचा धसका घेवून ८ ऑक्टोबर २०२३ रोजी निधन झाले आहे. स्वत:च्या शेतात पोलिसी पाठबळावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची या दोघा शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तेरा वाजवले आहे. शिवाय गावपुढारी सतत रस्त्यावरून ये-जा करत असल्याने परिवाराच्या जीवीताला धोका निर्माण झाला असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे.
अनधिकृतरित्या झूडशाहीच्या बळावर व काही ग्रामस्थांच्या राजकीय ओळखी व मंत्रालयीन ओळखीवर बनविला जात असून आता खोटी कागदपत्रेही बनविली जाण्याची भीति आहे. आता गावपुढारी १९६५ पूर्वी या रस्त्याला पूर्वीच्या मालकाने परवानगी दिल्याचे खोटे सांगत आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आजही सुनावणी होत आहे. तथापि पोलिसी बळावर रस्ता काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच केस आम्ही जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हरली आहे, असे सांगत न्यायप्रविष्ठ प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांची व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे धाडस दाखवित आहेत. राज्य सरकारने न्यायालयात केस सुरू असतानाही केसबाबत सोशल मीडियावर (यूट्यूब) खोटी माहिती देवून अफवा पसरविणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. वास्तविकपणे या शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल ४२ गुंठ्याची नासाडी करत विनाभूसंपादन करत रस्ता बनविला होता. गावपुढारी रस्ता बनवित असताना पोलीस घेवून हजर असतात. पोलीस त्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांच्या परिवाराला दमदाटी करत असतात. कोर्टात जा, तिथे काय करायचे ते करा, अशी दमदाटी करत असतात.
दि. ३० मे २०२३ रोजी पोलीस पाठबळावर गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केस जिंकल्याचे खोटे सांगत व जिल्हा परिषद अधिकारी भूसंपादन झाले नसल्याचे बेधडक सांगत शेतकरी परिवाराचे खच्चीकरण करत होते. रस्त्याचे काम सुरू असताना वयोवृद्ध शेतकरी उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) जीव तोडून या शेताचे भूसंपादन नाही, एक रूपयाचा मोबदला नाही. आमच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवर पोलिसी बळावर अतिक्रमण झाले आहे. असे सांगत होते. (यापूर्वीही २०१३-१४ दरम्यान झुंडशाहीच्या बळावर वयोवृद्ध शेतकऱ्यांना न जुमानता रस्त्याचे डांबरीकरण केले होते.) या रस्ता कामामुळे उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची व जमिनी भिजाट होण्याची शक्यता आहे. या शेतातील अतिक्रमणामुळे गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने उत्तम विष्णू खांडगे यांचे निधन झाले असून त्यांचा परिवार पोरका झाला आहे. दुसरे शेतकरी चद्रकांत विष्णू खांडगे यांनीही शेतात होत असलेल्या अतिक्रमणाचा व गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टीज रूग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून आयसीयूत होते. शासकीय अतिक्रमणामुळे या दोन परिवाराची वाताहत झाली आहे. शेतात अतिक्रमण कायम आहे. गावपुढारी या घरांचा होत असलेला तमाशा पाहत आहे.
या शेतावर विनाभूसंपादन ४२ गुंठेवर अतिक्रमण करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी आले असता, मयत शेतकरी कै. उत्तम विष्णू खांडगे यांनी या शेताचे भूसंपादन झाल्याचे पुरावे दाखवा, अतिक्रमण आमच्या शेतात का करता अशी विचारणा केली असता, त्यांनी भुसंपादन झाले नसल्याचे सांगितले, तर बंदोबस्ताला असलेले नारायणगावच्या पोलिसांनी या शेतकऱ्यांना व त्यांच्या परिवाराला, दोन मुलांना, सुनेला दमदाटी करत, जे काही सांगायचे असेल तर कोर्टात जा असे सुनावत कामाला आडवे याल तर जेलमध्ये टाकू असे दरडावले. ठेकेदाराला शेतकरी परिवार काम करून देत नसल्याने व आमच्या शेत जमिनीतील तब्बल ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण करू नका असा टाहो फोडत असताना ठेकेदाराने (काळवाडीचे वामन कंत्राटदार) गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून घेतले. गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित असलेल्या यूट्यूब मीडियासमोर (सोशल मीडिया) खांडगे कंपनी न्यायालयात केस हारल्याचे धडधडीतपणे खोटे सांगत जनसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अफवा पसरवली. या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी न्यायालयात आजही सुनावणी सुरू असताना सोशल मीडियावर (यूट्यूब) केस हारल्याचे खोटे सांगत न्यायालयीन प्रक्रियेचाही धडधडीत अपमान करण्याचा जाणिवपूर्वक गुन्हा केला आहे.
या ठेकेदाराचा नामफलक पाहिला असता, कामाची मुदत अवघ्या नऊ महिन्याची असताना ठेकेदार तीन ते चार वर्षे कसा काम करू शकतो? विनाभूसंपादन शेतावर अतिक्रमण कसे करू शकतो? मुळातच अजूनही काम अर्धवट आहे. आता ठेकेदार या अतिक्रमणावर डांबरीकरण करण्याची जोरदार तयारी करत आहे. त्याच्या माणसांनी अतिक्रमणाची सफाई केली आहे. हा ठेकेदार व त्याची माणसे इतकी मुजोर आहेत की शेतकरी परिवार ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ठेकेदाराच्या दहशतीखाली आहेत. अतिक्रमणावर झाडूने सपाई न करता थेट मशिन आणून अतिक्रमणावरील ४२ गुंठे जागेची सफाई केली. त्या अतिक्रमनावरील माती, धुळ या शेतकऱ्यांच्या शेतावर पसरली असून पिके धुळीत गेली असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
फलकावर नजर मारल्यास पुणे जिल्हा परिषद, पुणे बांधकाम विभाग (उत्तर) असा ठळक अक्षरामध्ये उल्लेख आहे.
निविदा रक्कम : ३४ लाख ८३ हजार ४५८ रुपये
कामाचा कालावधी : नऊ महिने
एजंन्सीचे नाव : मे रॉयल कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स
कार्यारंभ आदेश : B 1/HQ/59/ 2021-22
लेखाशिर्षक : ३०५४२०४३ ग्रामीण रस्ता विभाग
असा उल्ले आहे. ठेकेदाराने असे कोणते पुण्य केले आहे की कोणता राजकीय गॉडफादर आहे की, ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण करण्यासाठी ठेकेदाराला तब्बल ३ वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदत वाढ मिळालेली आहे अथवा दहशतीच्या बळावर आणि ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठबळावर तसेच काम रेटत आहे. आता पुन्हा या अतिक्रमणावर ठेकेदार डांबरीकरणाची जोरदार तयारी करत आहे.
या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. विनाभूसंपादन शेतातील ४२ गुंठे जागेवरील अतिक्रमणासाठी तीन ते चार वर्षे मुदतवाढ कशी मिळू सकते. आपण समस्येचे गांभीर्य पाहता कामास विलंब झाल्याने ठेकेदारास काळ्या यादीत टाकून संबंधित कंपनीवर व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. कामास विलंब झाल्याने ठेकेदारास आर्थिक दंड लावण्याची तरतूद असल्याने तो आर्थिक दंडही लावावा, या ४२ गुंठे जागेवर डांबरीकरण न करण्यासाठी ठेकेदाराला तातडीने आदेश देवून शेतकरी परिवाराला दिलासा द्यावा. या शेतकरी परिवाराने एक सदस्य गमविला आहे. दुसरा शेतकरी सिरीयस आहे. सर्व परिवाराची वाताहत झालेली आहे. अतिक्रमण तातडीने काढून टाकावे व विनाभूसंपादन शेतातील ४२ गुंठे जागेवर अतिक्रमणास हातभार लावणारे जिल्हा परिषद अधिकारी, सोशल मीडियावर केस हारल्याची अफवा सोडणाऱ्या गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ठेकेदार या सर्वांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत टाकण्यात यावे यासाठी संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.