जयेश रामचंद्र खांडगेपाटील याजकडून
जुन्नर : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचे उद्धार करते म्हणून ते सर्वमान्य झालेले आहेत. सर्वसामान्यांसाठी सतत प्रतिगामी शक्तीशी लढा देऊन भारतासारख्या खंडप्राय देशात समानतेचा, सामाजिक समतेचा विचार त्यांनी मांडला आणि त्या दृष्टीने कार्य केले. आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये हा विचार रुजवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेसारखे हे शिबिर खूप उपयुक्त ठरतील, असा आशावाद सुप्रसिद्ध क्रांतीकारी संकीर्तनकार रामदास वऱ्हाडी मौजे पिंपळगाव तर्फे नारायणगाव यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून शनिवारपासुन (दि २७ जानेवारी) सुरू झालेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी दिनचर्यनुसार व्याख्यानमालेत व्याख्यान देत असताना रामदास वऱ्हाडी बोलत होते.
कार्यक्रमाला लहू वाणी, संतोष वऱ्हाडी आणि इतर ग्रामस्थ यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरण येथील प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते