विनाभूसंपादन शेतामध्ये थेट जावून अतिक्रमण करणे हा एकाद्या सिनेमातला प्रसंग असेल, असा वरकरणी कोणाचाही गैरसमज असू शकेल. पण ही घटना पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडली आहे आणि तीदेखील शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर परिसरात. विशेष म्हणजे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगाव (आर्वी)च्या महिला सरपंच आणि पिंपळगावचे ग्रामपंचायत सदस्य यांनी सक्रिय पुढाकार घेत दिवसाढवळ्या ३० मे २०२३ रोजी हा उद्योग केला आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणाला ४४ हजार रूपये नारायणगाव पोलिस स्टेशनला भरत पोलिसांचे संरक्षण घेत हे अतिक्रमण केले आहे. जुन्नर नारायणगाव रस्त्यावर पिंपळगाव आहे. या गावच्या एसटी स्टॅण्डपासून चंद्रकांत विष्णू खांडगे व कै. उत्तम विष्णू खांडगे यांच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवर वर्षांनुवर्ष कोणतेही भूसंपादन न करता शेतकऱ्यांना पोलीसी पाठबळावर दमदाटी करत अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणाचा धसका घेत उत्तम विष्णू खांडगे या ७७ वर्षीय शेतकऱ्याचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी हार्ट अॅटकने निधन झाले आहे. दुसरा शेतकरी चंद्रकांत खांडगे नुकतेच वाशीतील फोर्टीज रुग्णालयात २६ दिवस आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देवून घरी परतले आहेत. या अतिक्रमणाबाबत दोघा भावांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३० मे २०२३ रोजी अतिक्रमण करताना पिंपळगावच्या महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी खांडगेकंपनी केस हारली असल्याचे सोशल मीडियावर सांगत (यूट्यूबवर मुलाखत) ग्रामस्थांची व पोलिसांची दिशाभूल केली. सोशल मीडियावर अफवा पसरविणे हा भारतीय कायद्याच्या भाषेत गंभीर गुन्हा असतानाही हा गुन्हा करूनही पिंपळगावच्या महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य खुलेआमपणे फिरत आहेत. हे सर्व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयातून घडले असल्याची जुन्नर तालुक्यात चर्चा होत आहे. पिंपळगावचा एक सदस्य महाजन यांच्या कार्यालयात गृह विभागाच्या माध्यमातून कार्यरत असून त्यानेच पडद्यामागून उद्योग करत या अतिक्रमणात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. या धसक्याने उत्तम विष्णू खांडगे यांचे निधन झाले असून त्यांचा परिवार पोरका झाला आहे. अतिक्रमणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक, न्याय व्यवस्था तसेच मंत्रालयीन पातळीवर खांडगे परिवार पाठपुरावा करत आहे. संघर्ष करत आहे. कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न होता, एक पैशाचाही मोबदला न देता या दोघा भावांच्या जमिनीवर अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे आणि त्याला साथ जिल्हा परिषदेने व नारायणगाव पोलिस स्टेशननी दिली आहे. जोपर्यत गिरीश महाजन यांच्या कार्यालयातून पिंपळगावचा घटक पडद्यामागून प्रशासनात सक्रिय भूमिका बजावत आहे, तोपर्यत खांडगे परिवाराला संघर्ष करावा लागणार आहे. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात असणारा गृह विभागातील घटकाची बदली होत नाही अथवा या घटकाचे उद्योग गृह खात्याच्या (गृह मंत्री, गृह राज्यमंत्री, गृह सचिव, पोलीस महासंचालक) निदर्शनास आणून दिले जात नाही, तोपर्यत खांडगे परिवाराची ससेहोलपट होत राहणार, त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांच्या ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण होत राहणार असे पिंपळगावातच नाही तर जुन्नर तालुक्यात उघडपणे सांगितले जात आहे. उद्या या दोन शेतकऱ्यांच्या परिवारापैकी कोणाला काही दगाफटका झाल्यास , जिविताचे बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी विनाभूंपादन ४२ गुंठे जागेवर अतिक्रमण करणारे पिंपळगावच्या महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक भागातील एक वाळू माफिया आणि ग्रामविकास मंत्रलयातील गिरीश महाजनांच्या जवळ वावरणारा गृह विभागातील पिंपळगावचा कर्मचारी जबाबदार असणार. खांडगे परिवार न्यायालयीन पातळीवर पाठपुरावा करतोय, संघर्ष करतोय. सर्वांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. विनाभूसंपादन शेतावर अतिक्रमण करून तब्बल ४२ गुंठे जागेची नासाडी कशी होतेय हे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी परिवाराला समजले पाहिजे, कळले पाहिजे.