स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशी सायन-पनवेल हायवे येथील वाशी प्लाझा शेजारी असलेल्या बसडेपो मध्ये नागरिकांना खूप त्रास सहन करायला लागतो. यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ५० लाख आमदार निधी देऊन नागरिकांच्या सर्व सुविधायुक्त बसडेपो मध्ये नागरिकांसाठी वेटिंग रूम, सुलभ शौचालय, उद्यान उपलब्ध करून देणार आहेत`. यासाठी प्रवाशांना बस स्थानकात येता जाता विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. बेलापूर मतदार संघांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रथमच २० कोटी रुपये हे सायन पनवेल हायवे लगत असेलेल्या नागरिकांना तसेच प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहे. याच अनुषंगाने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत समाजसेवक पांडुरंग आमले, अशोक विधाते, विकास सोरटे, अशोक चटर्जी, रुपेश मढवी, शशी भानुशाली, प्रवीण भगत, प्रताप भोसकर, महेश दरेकर, आशाराम राजपूत, जयेश थोरवे, सुभाष गायकवाड, संगीता म्हात्रे, अलका म्हात्रे व असंख्य नागरिक उपस्थित होते.
तसेच जेष्ठ पत्रकार विश्वरत्न नायर यांनी सांगितले की, मंदाताई म्हात्रे यांनी १९९५ पासून जी सुरुवात केली त्याचा मी साक्षीदार आहे. आज बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये महीलांसाठी खूप काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याच अनुषंगाने मंदाताई म्हात्रे यांचे बेलापूर विधानसभामध्ये कौतुक होत आहे.