स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६: Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ५ मार्च २०२४ रोजी सिडकोचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, मेट्रो, NAINA आणि पाणीपुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी ११,८३९.२९ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
सिडकोने वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प सादर करत भविष्यासाठी आव्हानात्मक उद्दिष्ट रचले आहे. नगर विकास क्षेत्रातील अग्रणी प्राधिकरण म्हणून ५० वर्षांहून अधिक काळ सिडकोची यशस्वी वाटचाल राहिली असून शहर निर्मितीचा ध्यास घेतलेल्या सिडकोने आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या सिडकोने नवी मुंबईसह सिडको अधिकारक्षेत्रातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळाव्यात याकरिता ई-प्रशासनाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर साध्य केले आहे.
या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र), नोडल वर्क, नवी मुंबई मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट, उलवे कोस्टल रोड, खारघर-तुर्भे लिंक रोड, रेल्वे, पालघर जिल्हा मुख्यालय, कॉर्पोरेट प्रकल्प आणि नवीन शहर प्रकल्प यासारख्या प्रकल्पांसाठी रू. ११,८३९.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, महागृहनिर्माण योजना इत्यादी सिडकोचे प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसोबतच नवी मुंबईतील सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर योजना जसे की कनेक्टिव्हिटी आणि पाणीपुरवठा इत्यादीसाठी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ११ हजार ९०२ कोटीपेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना दिलासादेखील मिळेल. “
श्री. विजय सिंघल
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडको अर्थसंकल्प 2024-25 : एक दृष्टीक्षेप
अर्थसंकल्पीय अंदाज (खर्च) | ||
क्र. | प्रकल्प | रक्कम (कोटी) |
1 | गृहनिर्माण | रू. 4018.74 |
2 | विमानतळ | रू. 977.15 |
3 | नोडल सार्वजनिक कामे (Nodal Works) | रू. 811.90 |
4 | पाणी पुरवठा | रू. 730.16 |
5 | मेट्रो | रू. 610 |
6 | नैना | रू. 569.37 |
7 | ठाणे एकात्मिक विकास (Thane Cluster) | रू. 400.23 |
8 | उलवे सागरी मार्ग | रू. 400.22 |
9 | खारघर तुर्भे लिंक रोड | रू. 300.00 |
10 | रेल्वे | रू. 284.28 |
11 | पालघर प्रकल्प | रू. 118.65 |
12 | कॉर्पोरेट प्रकल्प | रू. 24.40 |
13 | नवी शहरे | रू. 603.59 |
14 | इतर | रू. 1990.60 |
एकूण | रू. 11839.29 |