गुणगौरव समारंभ, वृक्षारोपण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण नोंदणी – अहवाल -७ जुलै, २०२४* अशा विविध कार्यक्रमांची मांदियाळ
सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : साईभक्त महिला फाउंडेशन मार्फत अनेक समाजोपयोगी शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. असाच आनखी एक नवीन उपक्रम समाजसेविका सौ. शारदाताई पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. सकाळपासूनच भरपूर कार्यक्रमांची रेलचेल होती. याच माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांसोबत वृक्षारोपण करण्यात आले. निरनिराळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड या उपक्रमाव्दारे करण्यात आली. पांडुरंग आमले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम तसेच नाना शिंदे श्रीपाद पत्की, विश्वास कणसे, रमेश शेटे त्याचबरोबर महिला भगिनी सौ स्वाती कदम हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुपारी ११ ते ४ च्या दरम्यान नवीन मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली २१० नवीन मतदारांचा भरघोस असा प्रतिसाद या मोहिमेला लाभला. त्याचबरोबर बहुचर्चित मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेचेही फॉर्म प्रभागातील गरजू महिलांकडून भरून घेण्यात आले. जवळजवळ ३०७ महिलांनी या नोंदणीला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद संकुलाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विलास वाव्हळ सर, तसेच सानपाडा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले. वाव्हळ सरांनी आपल्या भाषणातून अनेक बहुमूल्य प्रेरणादायी विचार भावी पिढीला दिले. त्यासोबत पन्हाळे सरांनी ही कायद्यात झालेल्या नवीन बदलांविषयी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. याही कार्यक्रमाला जवळजवळ १५५ विद्यार्थ्यांची व पालकांची लक्षणीय अशी उपस्थिती लाभली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संध्याकाळी आठ नंतर शारदाताई आमले यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. साई भक्त महिला कमिटीचे सौ. प्रतिभाताई पवार, मंगल वाव्हळ ,सुचिता शेटे, सुलोचना निंबाळकर, निता आंग्रे,संचिता जोईल हे पदाधिकारी तसेच या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. भाजपाचे युवा नेते निलेश म्हात्रे, प्रभागातील समाजसेवक अविनाश जाधव, चिंतामणी बेल्हेकर, पंकज दळवी, गणेश पावगे, कल्पना शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे मारुती कदम व विठ्ठल गव्हाणे ,नाना शिंदे , पाम बीच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीपाद पत्की यांचीही मौल्यवान उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. त्याचबरोबर साईभक्त महिला फाउंडेशनच्या सदस्य महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. नृत्य व गायनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी या अभिष्टचिंतन सोहळयाला रंगत आणली. वैशालीताई होळकर व सौ. दिपाली मराठे यांच्या उत्कृष्ट अशा निवेदनामुळे कार्यक्रम सुरेख झाला . कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, मान्यवर, सदस्य महिला , विद्यार्थी, पालक यांचे पांडुरंग आमले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.