श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील पावसाळी कालावधीतील समस्यांचे तातडीने निवारण करण्याची लेखी मागणी महापालिका प्रभाग ९६ च्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. त्या पावसाच्या अनुषंगाने प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील पावसाळी कालावधीतील समस्यांचे तातडीने निवारण करणे आवश्यक आहे.
पावसामुळे नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरात डासांचा उद्रेक वाढीस लागला असून परिसरात ताप, मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. परिसरातील डासांच्या समस्यांचे निर्मूलन न झाल्यास साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. साथीच्या आजारांचे वाढते प्रमाण पाहता पालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरात तातडीने धुर फवारणी अभियान राबवावे. केवळ रस्त्यावर, पदपथावर, गटारांच्या आतील भागात धुर फवारणी करुन डासांची समस्या नियत्रंणात येणार नाही. विशेष बाब म्हणून सोसायटीच्या अंर्तगत भागातही धुरफवारणी करणे आवश्यक आहे. याशिवाय गटारांमध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये अळीनाशक, तसेच डासनाशक औषधांची फवारणी करावी.
संततधार पावसामुळे नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतचे पदपथावर शेवाळ साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पदपथ निसरडे होऊन विभागातील मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक पदपथावरुन चालताना घसरुन पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर ब्लिचिंग पावडरची तातडीने फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा पदपथावरुन घसरुन प्रभागातील रहिवाशांबाबत मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.
नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरात पावसाळा सुरु होऊन अगदी ऑगस्ट महिन्याचे २ दिवस उलटले तरी वृक्षछाटणी अभियान राबविलेले नाही. वास्तविकपणे वृक्षछाटणी अभियान हा पावसाळीपूर्व कामाचाच एक भाग आहे. परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगत असणाऱ्या झाडांच्या ठिसूळ फांद्या पडण्याच्या घटना घडत आहेत. तातडीने वृक्षछाटणी न झाल्यास ठिसूळ फांद्या वाहनांवर अथवा रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या रहिवाशांवर पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरात वृक्षछाटणी अभियान राबवावे.
नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहनांना व रहीवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या रहीवाशांच्या अंगावर खड्ड्यात साचलेले ते पाणी उडते. याशिवाय रिक्षामध्ये बसलेल्या तसेच अन्य वाहनातील प्रवाशांना या खड्ड्यामुळे त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे.
पावसाळा सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. परिसरात पावसाळी समस्यांचा उद्रेक झाला आहे. पावसाळा सुरु होऊन पावणे दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी पावसाळीपूर्व कामे न झाल्याने समस्येचे गांभीर्य वाढले आहे. अपघात होण्याची भीती आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी पालिका प्रशासनाने वरिल नमूद केलेल्या समस्यांचे तातडीने निवारण करण्याचे संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे.
अन्यथा लोकवर्गणीतून ब्लिचिंग पावडर ने पदपथ स्वच्छ्ता,धुर फवारणी व औषध फवारणी करुन घेणार
प्रभागात निसरड्या झालेल्या पदपथावर ब्लिचिंग पावडर टाकण्यास व डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी धुरफवारणी करता यावी यासाठी पालिका प्रशासनाकडे पैसे व वेळ नसेल तर तसे सांगावे. आम्ही विभागातील नागरिकांकडून लोकवर्गणीतून पैसे जमा करुन ब्लिचिंग पावडर ने पदपथ स्वच्छ्ता,धुर फवारणी व औषध फवारणी करून घेवू फक्त त्या करिता लागणारी परवानगी आम्हास द्या,आपणास प्रभागातील समस्यांबाबत वारंवार लेखी निवेदने देऊनही कामे होत नसल्याने आज प्रशासनाला हे सांगण्याची वेळ आली आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून आपण सकारात्मक प्रतिसाद् द्याल, असे माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी निवेदनाच्या अखेरीस म्हटले आहे.