सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि भाजपा बेलापुर विधानसभा संयोजक निलेश विजय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात वाशी सेक्टर – ९ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत महाआरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभला.
भाजपा समाजसेवक विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, प्रताप भोसकर, मालती सोनी, सुवर्णा चिकने, महेश दरेकर, प्रविण चिकने यांच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यात आले. लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स, डॉ. प्रताप मुदलियार, मयुरेश हॉस्पिटल तुर्भे व एस.एल.वी.सी क्लिनिक (रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ) डॉ. सागर सातपुते, यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, गेली २९ वर्षापासून मी निवडून येत आहे. तेव्हापासून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. तसेच मला अत्यंत आनंद होत आहे की जनतेची व वयोवृद्ध नागरिकांची सेवा करण्यास मला संधी मिळत असून हे कार्य मी पुढे सुरूच ठेवणार आहे. तसेच सुरू असलेल्या पावसाळ्यात उद्भवणारे सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया अश्या अनेक प्रकारच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून मोफत महाआरोग्य शिबिराची संकल्पना आपण प्रत्येक विभागात नागरिकांसाठी उपलब्ध करत आहोत. वाशी सेक्टर -९ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सदर मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली होती. सदर शिबिराला हजारो नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून मला समाधान वाटत आहे. माझे अनेक सहकारी यांच्या सहकार्याने सदर महाआरोग्य शिबीर संपन्न झाली. वाशी येथील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, हा या मागचा उद्देश असून आज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व तरुणांनी शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत विशाल साबळे, अजम शेख, सुमेध साळवे, कुलदीप केदारे, रामकृष्ण अय्यर, रितेश तांडेल, वाशी विभागातील सोसायटींचे पदाधिकारी व असंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.