नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील खुल्या गटारावर झाकणे बसविण्याची कॉंग्रेसची मागणी
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील गटारावर झाकणे त्वरीत बसविण्याची मागणी नेरूळ सेक्टर सहा वस सारसोळे गाव या प्रभाग ८६ मधील कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या क्रिडांगणात महापालिकेने गणेशोत्सवामध्ये कृत्रिम तलावाचा स्तुत्य उपक्रम विसर्जनसाठी राबविला होता. या क्रिडांगणामध्ये चालण्याच्या मार्गिकेवर बाजूलाच भूमिगत गटर आहे. या गटारावरील सिमेंटची झाकणे (मोठ्या आकाराचे ठोकळे) निघून गेले आहेत, तर काही गटारातच गळून पडले आहेत. यामुळे गटारातील डासांचा पायवाटेवरुन सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच गटारे खुली असल्याने दुर्गंधीचा सामनाही करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी विसर्जनासाठी आलेल्या गर्दीतील काही जण थोडा वेळ बाजूला उभे राहील्याने त्या गटारात पाय गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खुल्या गटाराची झाकणे (सिमेंटचे ठोकळे) तेथेच विखुरले गेले आहेत. क्रिडांगणात वॉकच्या मार्गिकेवर चालावयास येणाऱ्या स्थानिक रहिवाशांना डासांचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना खुल्या गटारावर झाकणे बसविण्याचे निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.