विजय शेटे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये तरुणाईचे व भाविकांचे आकर्षण असलेला भगवती महिला मंडळाचा सार्वजनिक नवरात्रौत्सव वरुणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी असणाऱ्या मैदानावर रंगणार आहे.
३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरदरम्यान हा नवरात्रौत्सव होणार असून शिवसेना विभागप्रमुख प्रल्हाद पाटील व भगवती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
खासदार संजय दिना पाटील, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना महिला संघठक सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, शहरप्रमुख व माजी नगरसेवक काशिनाथ पवार, उपशहरप्रमुख गणेश घाग, माजी नगरसेवक व माजी शिवसेना पक्षप्रतोद रतन मांडवे, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, विसालस ससाणे, माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, विभागप्रमुख तानाजी जाधव, शिवाजी महाडीक, हरीश इंगवले, लक्ष्मण पोपळघट आदी या नवरात्रौत्सवात सहभागी होणार आहेत.
हा नवरात्रौत्सव यशस्वी करण्यासाठी नवरात्रौत्सव कमिटीचे सचिव बबन जोशूी, खजिनदार हनुमंत म्हस्के, उपाध्यक्ष सुखदेव पाटील, राजू पाटील, उपसचिव देवा तामडेल, शुभम पाटील, सहसचिव नितिन कांबळे, सहखजिनदार गजाजन खंदारे, सतण साळवी, उपखजिनदार चेतन सिंदे, महेश गावकर या पदाधिकाऱ्यांसह नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी, सारसोळे गावचे ग्रामस्थ, शिवसैनिक परिश्रम करत आहेत. या नवरात्रौत्सवात देवीच्या दर्शनासाठी नेरूळ नोडमधील भाविकांनी व गरबा-दांडिया खेळण्यासाठी युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भगवती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. समुद्राताई प्रल्हाद पाटील यांनी केले आहे.