सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघामध्ये सानपाडा नोडमध्ये साईभक्त महिला फांऊडेशन आणि साईभक्त सेवा मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या नवरात्रौत्सवाचे भाविकांना व तरुणाईला दांडियाचे आणि महिलांना मिळणाऱ्या बक्षिसरुपी मिळणाऱ्या पैठणी साड्यांचे आकर्षण असते. सानपाडा नोड, सानपाडा पामबीच व जुईनगर, तुर्भे परिसरातील तरुणाई या नवरात्रौत्सवामध्ये ओंसडून वाहत असते. ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान साईभक्तचा नवरात्रौत्सव सानपाडा सेक्टर दोनमधील सौराष्ट्र पटेल हॉलशेजारील भुखंड क्रमांक १० वर आयोजित करण्यात आला आहे.
बेलापुर विधानसभेच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, साईभक्त महिला फांऊडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा पांडुरंग आमले आणि अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व साईभक्त सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सकाळी १० वाजता व सांयकाळी ६ वाजता देवीची आरती आणि सांयकाळी ७ ते १० गरबा असे ता नवरात्रौत्सवाचे स्वरुप आहे. ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी तीन पैठणी साड्या तर ७ ऑक्टोबर ११ ऑक्टोबरदरम्यान गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी पाच पैठणी साड्या बक्षिस देण्यात येणार आहे. या नवरात्रौत्सवामध्ये विविध बक्षिसांची रेलचेल आहे. तरुण वर्गासाठी, महिलांसाठी ग्रुप डान्स पारितोषिक, लहान व मोठ्या गटासाठी ग्रुप डान्स पोरितोषिक दररोज दिले जाणार आहे. याशिवाय ६ ते ११ ऑक्टोबरदरम्यान खेळण्यासाठी येणाऱ्या गरबा प्रेमीसाठी लकी ड्रा बंपर प्राईज देण्यात येणार आहे. या प्राईजमध्ये इंडक्शन, ओव्हन ओटीजी, कुलर, एलसीडी स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन, सोन्याची नथ व फ्रिज अशी विविध बक्षिसे मोठ्या संख्येने गरबाप्रेमींना दिली जाणार आहेत.
११ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ७ ते १० दरम्यान भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे.
सानपाडा नोड, सानपाडा पामबीच, वाशी, तुर्भे, जुईनगरमधील भाविकांनी मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी तसेच गरबाप्रेमींनी गरबा खेळण्यासाठी व बक्षिसे मिळविण्यासाठी या नवरात्रौत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे व पांडुरंग आमले तसेच शारदाताई आमले यांनी संयुक्तपणे केले आहे.