८०% स्थानिकांना नोकरी द्या : गजानन काळे यांची मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांची परिवर्तन यात्रा मंगळवारी सातव्या दिवशी बेलापूर-सीबीडी येथे पोहोचली. यावेळी गजानन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी द पार्क या हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी मनसेने द पार्क हॉटेलच्या व्यवस्थापनाला हॉटेल मध्ये एकूण किती स्थानिक काम करतात, याची विचारणा केली. यावेळी भेटलेले बहुतांश कर्मचाऱ्यांना मराठी बोलता येत नव्हते. यावरून हॉटेलने राज्य शासनाच्या ८०% स्थानिकांची नोकर भरती या शासन निर्णयाला हरताळ फासल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे अजून हॉटेलने आपली नोंदणी शासनाच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाकडे का केली नाही, अशी विचारणासुध्दा गजानन काळे यांनी द पार्क प्रशासनाला केली.
येत्या काही दिवसात हॉटेलने एकूण भरतीची माहिती आणि त्यात किती स्थानिक आहेत, याची माहिती मनसेला द्यावी असे सुनावले. जर ही माहिती नाही दिली तर मनसे आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवेल असे सुनावले. मनसेच्या या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासोबत महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे शहर सचिव सचिन कदम, महिला सेना उपशहरअध्यक्ष दीपाली ढवुल, शहर सचिव सायली कांबळी, यशोदा खेडस्कर, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, गणेश भावर, विभाग सचिव श्याम कोळी, उप विभाग अध्यक्ष प्रशांत कोळी, विनोद लांडगे, शाखा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, किशोर पाटील, चंद्रकांत कोळी, बालाजी लांडगे, महेश सावंत, विद्यार्थी सेनेचे मधुर कोळी, ऋषिकेश पवार, महिला सेनेच्या सुनंदा मोरे, महाराष्ट्र सैनिक सिद्धेश जागे, संदेश पाटील व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.