संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
तुर्भे येथील रखडलेला उड्डाणपूल बनलाय मृत्यूचा सापळा
मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांचे आमरण उपोषण
गजानन काळे यांची उपोषण स्थळी भेट
नवी मुंबई : तुर्भे येथे बांधण्यात येणारा उड्डाणपुलाचे काम प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रखडले आहे. या रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे मागील काही महिन्यांत चार पादचाऱ्यांचे नाहक बळी गेले. तुर्भे येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
सोमवारी (२ डिसेंबर) या उपोषण स्थळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी भेट दिली. त्यांनी या विषयाचे गांभीर्य जाणून घेतले. महानगरपालिका शहर अभियंता यांना तात्काळ संपर्क करून उड्डाणपुलाचे काम जलदगतीने व्हावे, काम पूर्ण होई पर्यंत तात्पुरता पादचारी पूल बांधण्यात यावा, तुर्भे येथे कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी अशी मागणी केली. या मागण्या तात्काळ पूर्ण नाही झाल्या तर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना घेवून पालिका आयुक्त यांच्या केबिन बाहेर आंदोलन करू असा इशारा दिला.
पालिका अभियंते या बाबतीत बैठक घेवून तोडगा काढणार आहेत असा विश्वास पालिका अभियंत्यांनी गजानन काळे यांना दिला.