नवी मुंबई : वाशी सेक्टर दोनमधील अबॉर्ट हॉटेलमध्ये भरविण्यात आलेल्या मनुभाई ज्वेलर्स आयोजित ज्वेलरी प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक महिलेच्या सजण्यामध्ये दागिना हा तिच्या सौंदर्यामध्ये परिपूर्ण ठरतो. महिला आणि दागिना हे समीकरण काही नविन नाही. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान करून साज करण्यात प्रत्येक महिलेचा अट्टहास असतो. याच अनुषंगाने ‘मनुभाई ज्वेलर्स’ यांनी खास नवनवीन व आकर्षक अशा ज्वेलरी डिझाईन्स वाशी विभागातील भगिनींसाठी प्रदर्शित केले. त्याचा भव्य प्रदर्शन सोहळा अबॉट हॉटेल से -२ वाशी या ठिकाणी भरविण्यात आला होता.
या प्रदर्शनाला भेट देऊन मोठ्या सवलतीसह उपलब्ध असलेली ज्वेलरी विविध प्रकारच्या बांगड्या, मंगळसूत्रे तसेच वैविध्यपूर्ण आभूषण संग्रहाचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आस्वाद घेतला. यावेळी आ. मंदाताई म्हात्रेसमवेत सहकारी, मनुभाई ज्वेलर्स एक्झिबिशनचे कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.