यु.एस. वर्ल्ड ओपन तायक्वॉंडो चँम्पियनशिप
योगेश शेटे
नवी मुंबई : पोर्टलँड येथील ओरेगॉन कनवेंशन सेंटरला, यु.एस.वर्ल्ड असोसिएशनने २६ ङ्गेब्रुवारी ते १ मार्च २०१४ या दरम्यान यु.एस.वर्ल्ड ओपन चँम्पियनशीप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत अनेक देशाच्या खेळाडुंनी सहभाग नोंदविला होता. भारतातर्ङ्गे ४५ किलो खालील वजनी गटात ज्युनियर कॅडर मध्ये रायगड, नवी मुंबईचा हिमांशु
विसाळे याची निवड करण्यात आली होती.
कर्नाळा स्पोर्टस ऍकेडमीचा तसेच आंतरराष्ट्रीय पंच व भारतीय टीमचे प्रशिक्षक
सुभाष पाटील यांच्या तालमीत तयार झालेला हिमांशु विसाळे हा तायक्वांडो खेळाडू या जागतिक स्पर्धेत नक्की सुवर्ण पदक मिळवेल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी तो अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला होता.
हिमांशुने उपांत्य ङ्गेरीत अमेरिकेच्या अब्राहम हॉंग चँग चा पराभव केला व अंतिम ङ्गेरीत हॉंगकॉंगच्या जीया जीन हॉंग चा ६१ ने पराभव करत सुवर्ण पदक मिळवले व आमदार विवेक पाटील यांचा विश्वास सार्थ केला. याच ठिकाणी आँलिंपीक दर्जाचे प्रशिक्षक मास्टर ली यांचा १ दिवसाचा तायक्वांडो प्रशिक्षण सेमीनार आयोजित केला होता. त्यातही हिमांशुने सहभाग नोंदवुन ऑलिंपीक दर्जाचे प्रशिक्षण घेतले. हिमांशु हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तायक्वांडोपटू आहे. या पूर्वीही त्याने दक्षिण कोरिया, इस्त्रायल, स्कॉटलँड येथे झालेल्या जागतिक स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला आहे व पदके मिळवलेली आहेत. त्याच्याकडून ऑलिंपीक दर्जाच्या कामगिरीची मला अपेक्षा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असे हिमांशुचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रिय पंच सुभाष पाटील म्हणाले.
माझ्या या यशाचे श्रेय माझे प्रशिक्षक सुभाष पाटील यांना जाते. सेंट जोसेङ्ग (सि.बी.एस.ई.) शाळेच्या माझी मुख्याध्यापिका श्रीमती. कल्पना द्विवेदी आमदार विवेक पाटील तसेच विविध माध्यमातून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारे रायगडवासीय, नवी मुंबईकारांचा मी ऋणी आहे असे हिमांशु म्हणाला. कर्नाळा स्पोर्टस ऍकेडीचे अध्यक्ष व तायक्वांडो असोसिएशन ऑङ्ग महाराष्ट्रचे उपाध्यक्ष, आमदार विवेक पाटील यांनी हिमांशुचे विशेष अभिनंदन केले.
तायक्वांडो असोसिएशन ऑङ्ग महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रविण साळुंखे, खजिनदार विनायक गायकवाड तसेच रायगड तायक्वांडो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सेंट जोसेङ्ग हायस्कुल (सि.बी.एस.ई.), खांदा कॉलनीच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कल्पना द्विवेदी यांनी हिमांशुचे अभिनंदन केले.