मनोज मेहेर – ९८९२४८६०७८
ठाणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंगे्रस-पी.आर.पी आघाडीचे ठाणे लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार खा. संजीव नाईक यांची शनिवारी सकाळी ठाणे पूर्व भागातील कोपरी परिसरामध्ये प्रचार रॅली निघाली या रॅलीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी संजीव नाईक यांचे उत्स्फूर्त स्वागत करुन त्यांना विजयासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
चेंदनीकोळीवाडा येथुन या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. पुरुष, महिला, तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी महिला वर्गाने नाईक यांना ओवाळून त्यांना गृहणी वर्गाचा पाठिंबा दर्शविला. चेंदनी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, गावदेवी मार्केट, ठाणेकर वाडी, आनंदनगर इत्यादी परिसरातून ङ्गिरल्यानंतर मेंटल हॉस्पीटल येथे रॅलीची सांगता झाली. खा. नाईक यांनी ठाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिनी इनडोअर स्टेडीअमची निर्मिती केली त्यामुळे ठाण्यातील खेळाडुंना खेळासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सरकते जिने, सॅटिजला जोडणारा पादचारी पुल अशा अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सर्वसामान्य ठाणेकरांचा प्रवास सुसहय करण्यासाठी जेएनयुआरएन अंतर्गत ठाणे परिवहनला बसेस मिळवून दिल्या आहेत.
कोपरीतील रॅलीमध्ये ठाणे कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, कॉंग्रेस ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र ङ्गाटक, आ. निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष नितिन पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक लक्ष्मण टिकमाणी, मानसी पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते.