योगेश शेटे
नवी मुंबई : निवडणूका आल्यावर पक्षाच्या नेतेमंडळींचा आणि पदाधिकार्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा कस लागत असतो. शिवसेना-मनसेची तसेच कॉंग्रेसची संघटनाबांधणी त्या त्या पक्षाने आपल्या परिने केलेली आहे. नवी मुंबईत सर्वाधिक कमकुवत पक्षसंघटना असेल तर एनसीपीचीच. आजवर ना. गणेश नाईकांच्या जनसंपर्कावर आणि कार्यशैलीवर एनसीपीने मतांचा जोगवा मागितला खरा, पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीत ते शक्य नसल्याने यंदाच्या लोकसभा निवडणूकीत आणि आज (दि. २४ एप्रिल) झालेल्या मतदानावरून पहावयास मिळाले. त्यामुळेच अवघ्या चार-पाच महिन्यावर येवून ठेपलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईचा बालेकिल्ला टिकविण्यासाठी व नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन विधानसभा आपल्या अखत्यारीत ठेवण्यासाठी एनसीपीला मोठ्या प्रमाणावर ग्रासरूटपासून ते टॉपपर्यत खांदेपालट हा करावाच लागणार आहे. अन्यथा हीच परिस्थिती कायम राहील्यास एनसीपीला विधानसभा निवडणूक निकालात काही वेगळेच चित्र पहावयास मिळण्याची दाट शक्यता आहे.
नवी मुंबईमध्ये एनसीपी, शिवसेना आणि कॉंग्रेस या तीनच पक्षाची प्रामुख्यानेे जनसामांन्यामध्ये गणना होत असते. बाकीचे अटकळ-फुटकळ मंडळींना कोणी चर्चेमध्ये अथवा मतपेटीमध्येदेखील कोणी फारसे विश्वासानेे घेत नाही. शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुुख विजय चौगुले, कॉँग्र्रेसचे दशरथ भगत आणि एनसीपीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर या तीन जणांचीच नवी मुंबईतील प्रतिमा व पात्रपरिचय पाहिल्यावरच कोणालाही सहज अंदाज बांधणे शक्य होईल. विजय चौगुले आणि दशरथ भगत ही नावे परिचयाची वाटतात, पण एनसीपीचे गोपीनाथ ठाकूर म्हटल्यावर अनेकांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटते.
शिवसेनेचा विभागप्रमुख हा उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या वारंवार बैठका घेत असतो, संघटनात्मक आढावा घेवून शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करत असतो. कॉंग्रेसचा ब्लॉक अध्यक्षदेखील त्याच धतीर्र्वर वाशीतील कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या संघटनात्मक बैठका या होतच असतात. त्यातुलनेत एनसीपीच्या तालुकाध्यक्षाचे कामकाज काय होते, कधी होेते आणि कशा प्रकारे होते याबाबत खुद्द एनसीपीच्या कार्यकर्त्यांनाही माहिती नसते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत हे सातत्याने आंदोलनेे अथवा संघटनात्मक मेळाव्यातून जनसामान्यांमध्ये चर्चेला येतच राहतात. पण एनसीपीचे गोपीनाथ ठाकूर हे आंदोलने, मेळावे तर सोडाच पण एनसीपीच्या नेरूळमधील नगरसेवकांच्या नागरी कामालादेखील उपस्थित राहत नाहीत. कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत एनसीपीची पक्षबांधणी खिळखिळी झालेली आहे.
एनसीपीची नवी मुंबईतील पक्षसंघटना ही केवळ कागदोपत्रीच राहीलेली असून ही पक्षसंघटना बळकट करण्यापासून पक्षस्थापनेपासूनच कधीही गांभीर्याने प्रयास झालेेले नाहीत. एनसीपीमध्ये स्थानिक भागातही नगरसेवकांच्याच दावणीला त्या त्या भागातील पक्षसंघटना बांधलेली पहावयास मिळते. नगरसेवकांपुढे त्यांच्या प्रभागात पक्षीय पदाधिकार्यांना फारसे महत्व दिले जात नाही. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत कमकुवत पक्षबांधणीमुळे कधी नव्हे ती प्रथमच प्रचार अभियानात बोनकोडेकरांची दमछाक झाली. पक्षसंघटनाच कमकुवत असल्याने नगरसेवकांवरच मदार ठेवावी लागली. पदाधिकार्यांमध्ये स्वत:हून फारसा उत्साह दिसलाच नाही. बोनकोडेचे कोणी आल्यावर पटकन यायचे आणि बोनकोडेकर निघून गेल्यावर पटकन निघून जायचे हाच एककलमी कार्यक्रम एनसीपी पक्षसंघटनेत कागदोपत्री कार्यरत असणार्यांचा यंदाच्या निवडणूकीतही एककलमी कार्यक्रम पुन्हा एकवार पहावयास मिळाला.
एनसीपीच्या पक्षसंघटनेतील मंडळी जनसामान्यांमध्ये स्वत:हून फारसे उत्साहाने काम करताना पहावयास मिळत नाही. सकाळी उठून बोनकोडेतील बालाजीला अथवा व्हाईट हाऊसला जावून बोनकोडेकरांच्या पुढे ‘चमकेशगिरी’ करायची तसेच पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ना. गणेश नाईकांच्या निदर्शनास येण्यासाठी धावपळ करायची तसेच सणासमारंभाना होर्डिग लावून आपले अस्तित्व दाखवून द्यायचे हाच फंडा पक्षस्थापनेपासून एनसीपीच्या पदाधिकार्यांकडून व कार्यकर्त्यांकडून अवलंबिला जात आहे. यापूर्वीच्या राजकीय समीकरणांमुळे चमकेश घटकांचे अपयश झाकले जायचे. पण आता राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे.
लोकसभा व विधानसभा मतदारसंंघाचे कार्यक्षेत्र गतनिवडणूकांपासून कमी झाल्याने स्थानिक भागातील मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज बदलत्या काळात भासू लागली आहे. भक्कम पक्षबांधणीचा लोेकसभा निवडणूकीत शिवसेनेला प्रचार अभियानामध्ये फायदाच झाला. पण एनसीपीला मात्र बोनकोडेकरांच्याच करिश्म्याचाच आधार घ्यावा लागला. विधानसभा निवडणूका आता तोंडावर येवून ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत मोदी पॅटर्न, ठाण्यातील उमेदवार, विजय नाहटा, वैभव नाईक, चौकसभांचा धुराळा यामुळे शिवसेना आणि एनसीपीतील पक्षसंघटनेमधील जमिनआसमानचा फरक प्रकर्षानेे पहावयास मिळाला. एनसीपीनेे फक्त फेसबुकचा आधार घेत आपल्या पक्षाची मार्केटींग करत राजन विचारे गुन्हेगार हेच चित्र रंगविले ते पण फेसबुकवरच. याला तोडीस तोड प्रत्युत्तर शिवसेनेने दिले ते पण जनसामान्यांमध्ये जावून, नाक्या नाक्यावर चौकसभा घेवूनच! एनसीपीच्या आरोपातील हवा काढताना मुख्तार अन्सारीपासून एनसीपीच्या नगरसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रकाशझोत टाकला.
लोकसभा निवडणूकांचा निकाल १६ मेला जाहीर होणार असला तरी तोंडावर येवूून ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकांकरीता एनसीपीला पक्षसंघटनेत युध्दपातळीवर खांदेपालट करावा लागणार आहे. वॉडर्र् अध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षांपर्यत सवार्र्ंनाच पक्षीय संघटनेच्या माध्यमातून सक्रिय करावे लागणार आहे, खर्या अर्थांने जनताभिमुख करावे लागणार आहे. विधानसभा निवडणूकीकरीता बेलापूरमधून विजय नाहटांना तर ऐरोलीतून वैभव नाईकांना शिवसेना तिकीट देणार असल्याची शिवसैनिकांमध्ये जोरदारपणे चर्चा सुरू आहे. प्रतिस्पर्धी संभाव्य तगडे उमेदवार, कमकुवत पक्षसंघटना या पार्श्वभूमीवर बोनकोडेकरांनाही संघटनात्मक पातळीवर लवकरात लवकर खांदेपालट हा करावाच लागणार आहे. पक्षसंघटना प्रभावी न झाल्यास व पक्षीय पदाधिकार्यांनी आपल्या निवासी भागात जनताभिमुख काम न केल्यास कमकुवत पक्षसंघटनेचा एनसीपीला विधानसभा निवडणूकीतही नवी मुंबईत दगाफटका बसण्याची भीती एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.