महाराष्ट्र राज्याच्या लोकसभेेच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदान संपले असून १६ मे रोजी निवडणूकांचा निकाल लागणार आहे. तथापि शिमगा संपले, उरले कवित्व या निकषावर आता केवळ निवडणूकांच्या गप्पाच सुरू आहेत. तथापि विधानसभा निवडणूक लढविणार्या इच्छूकांनी मात्र पडद्याआडून विधानसभा निवडणूकीची चाचपणी सुरु केली असल्याचे पहावयास मिळत आहे.़
पाच वर्षापूर्वी विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत अवाढव्य असणार्या बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होवून पाच मतदारसंघात रूपांतर झाले. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ऐरोली आणि बेलापूर असे दोन विधानसभा मतदारसंघ तयार झाले. महायुतीमध्ये बेलापूर मतदारसंघ भाजपाने तर ऐरोली मतदारसंंघ शिवसेनेने लढविला. दोन्ही जागांवर शिवसेना-भाजपा उमेदवारांचा पराभव झाला.कॉंग्रेस-एनसीपीच्या आघाडीत दोन्ही मतदारसंघ एनसीपीच्या वाट्याला आले. एनसीपीने दोन्ही जागांवर विजय मिळविला. जागावाटपात एकही जागा कॉंग्रेसला न मिळाल्याने कॉंग्रेसी घटक आजही नाराजच आहेत. कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी बंडखोरीचे निशान फडकवित अपक्ष म्हणून निवडणूक लढवित १५ हजाराच्या आसपास मते मिळविली. आजही याच नाराजीचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसी घटकांनी लोकसभा निवडणूकीत खुलेआमपणेे शिवसेनेचे काम केले. मनसेने ऐरोलीची जागा न लढविण्याचे औदार्य दाखवित बेलापूरमध्ये दंड थोपटले. बेलापूरमध्ये राजेंद्र (पप्पू) महालेंसारख्या नवख्या उमेदवाराला मनसेने संधी दिलेली असताना २० हजाराच्या आसपास मते मनसेनेे मिळविली.
ऑक्टोबर महिन्यात येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकांकडेेच प्रत्येक पक्षातील मातब्बर महत्वांकाक्षीचे लक्ष लागून राहीले आहे. बेलापूर जागा शिवसेनाच लढविणार याबाबत शिवसैनिक ठाम असून गुहागरच्या बदल्यात शिवसेना बेलापूर परत घेणार असल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहेे. हावरेंच्या उदासिन राजकारणामुळे बोनकोडेस शह देवू शकेल असा मातब्बर उमेदवार राहीलाच नसल्याने ही जागा शिवसेनाच लढविणार असल्याचा सूरही शिवसैनिकांकडून आळविला जावू लागला आहे.
ऐरोलीकरीता शिवसेनेकडून खुद्द जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंसह युवा नेता वैभव नाईकांचेही नाव आघाडीवर आहे. बेलापूरच्या जागेसाठी शिवसेनेच्या छावणीत उपनेते विजय नाहटा यांच्यासह उपजिल्हाप्रमुुख ऍड. मनोेहर गायखेे, बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे आदींच्या नावाची चर्चा होेत आहे. भाजपानेे बेलापूर लढविल्यास एनसीपीच्या एका मातब्बर नेतृत्वाने भाजपाकडून बेलापूर लढविण्याची जय्यत तयारी पडद्याआडून सुरू केलेेली आहे. मात्र लोकसभा निवडणूकीत संजीव नाईक पराभूत झाल्यास भाजपातून विधानसभा लढायची आणि संजीव नार्ईक विजयी झाल्यास गुमानपणे एनसीपीतच पडून राहायचे असे या एनसीपीच्या एका नेतृत्वाचे मनसूबे असून खासगीत बोलताना आपल्या निकटवर्तीयांकडे हे मनसुबे बोलूनही दाखविले आहेत.़
लोकसभा निवडणूक निकालावर नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. विधानसभा मतदारसंघ लहान झाल्यानेे प्रस्थापितांची खर्या अर्थांने डोकेदुखी वाढीस लागली आहे. हजार-दीड हजार मतांवर प्रभाव पाडू शकणार्या स्थानिक कार्यकर्त्यांचीही निवडणूक काळात मनधरणी करण्याची वेळ नवी मुंबईतील मातब्बरांवर आलेली आहे.
नवी मुंबईतील मनसेचा प्रभाव हा देखील १६ तारखेलाच स्पष्ट होईल. मनसेच्या अर्ंतगत भागात मोठ्या प्रमाणावर कुरबुरी वाढीस लागल्या आहेत. मनसेच्या एका शहर उपाध्यक्षाच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या वावडया वरचेवर निर्माण होतच असतात. शहर कार्यकारिणीतील एका सचिवाचा मस्तवालपणा आणि बोलण्यातील मग्रुरी शहर अध्यक्ष गजानन काळेेंना मनसेच्या अन्य पदाधिकार्यांपासूून आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तोडत चालला आहेे. मनसेच्या विभाग अध्यक्षांपासून ते काही प्रमाणात शाखाध्यक्षही मनसेच्या स्थानिक पातळीवरील नेतृत्वाविषयी उघडपणे नाराजीचे सूर आळवू लागले आहेत. निवडणूकीच्या दिवशी कार्यकर्त्यांना वाटले जाणारे जेवण आणि कार्यकर्त्यांची झालेली आबाळ ही नवी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात चावडी गप्पांचा विषय बनली आहे. निवडणूक निकालानंतरच मनसेच्या रथी-महारथींचे पाय जमिनीवर येण्यास शक्य होणार आहे. तुर्तास शहर सचिवामुळे शहर अध्यक्षाची प्रतिमा मलिन होेत असल्याची नाराजी मनसैनिकांकडून व्यक्त होवू लागली आहे.
विधानसभा निवडणूकीतही मनसेला फारसे गांभीयार्र्नेे घेतले जाणार नसल्याचे संकेत लोकसभा निवडणूकीतील प्रचार अभियानातील अंंतिम टप्प्यात स्पष्ट झाले आहे. मनसेकडून विधानसभेला ऐरोलीतून शहर उपाध्यक्ष गजानन खबाले व निलेश बाणखिले तर बेलापूरमधून शहर अध्यक्ष गजानन काळेंसह कामगार नेते विजय घाटेच प्रबळ दावेदार राहण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभेच्या ऐरोली व बेलापूर मतदारसंघात एनसीपी व शिवसेनेतच कडवट झुंज होण्याची दाट शक्यता असून कॉंग्र्र्रेसी घटकांची भूमिकाही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ऐरोलीच्या तुलनेत बेलापूर मतदारसंघात कॉंग्रेसी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. नवी मुंबईत आघाडी न करता मैत्रीपूर्ण लढत लढण्याविषयी कॉंग्रेसचे घटक आग्रही असून यदाकदाचित असे झाल्यास बेलापूर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा फटका एनसीपीलाच अधिक बसण्याची यंदा शक्यता आहे.
लोकसभा निवडणूकांच्या निकालाची प्रतिक्षा न करता विधानसभा लढण्यासाठी प्रबळ महत्वाकांक्षा असणार्यांनी विश्रांती न घेता विधानसभा निवडणूकीची चाचपणी सुरू केली आहे. प्रभागवाईज, जातवाईज अगदी गृहनिर्माण सोेसायट्यावाईज अहवाल व्यक्तिगत पातळीवर बनविण्याचे जोमाने काम सुरू केले आहे. विधानसभा निवडणूकादेखील आता जेमतेम पाच महिन्यावर आल्या असल्याने मोर्चेबांधणीने आतापासूनच पडद्याआडच्या घडामोडीनेदेखील गती पकडली आहे.