नवी मुंबई :- महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस, सिडको संचालक व नवी मुंबई कार्यक्षेत्रातील कॉंग्रेसचे मातब्बर नेते नामदेव भगत यांचा वाढदिवस सारसोळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने रात्रीच्या १२च्या ठोक्यालाच जल्लोषात साजरा करण्यात आला.
गेल्या दीड दशकापासून नवी मुंबईच्या मातब्बर राजकारण्यांमध्ये नामदेव भगत यांची प्रामुख्याने गणना होत आहे. सर्वसामान्य कोळी समाजातील भाविक परिवारात जन्म घेवून सिडको संचालक व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणिस पदापर्यंत नामदेव भगत यांनी परिश्रमाच्या पाठबळावर मजल मारली आहे. वाटचालीत त्यांनी त्यांच्यासमवेत असणार्या कार्यकर्त्यांना कधीही वार्यावर सोडले नसल्याने आजही कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्यासभोवताली नेहमीच असते.
सारसोळे गावचा आणि नामदेव भगत यांचा आगळावेगळा ॠणानुबंध आहे. नामदेव भगत यांचा जन्मदिवस २० मे. हा दिवस सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील नामदेव भगत यांच्या समर्थकांकडून तसेच सारसोळेच्या ग्रामस्थांकडून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो.
गेली तीन दशकाच्या नवी मुंबईकरांनी ना. गणेश नाईकांना प्रारंभापासूनच साथ दिलेली आहे. गणेश नाईक शिवसेनेत असो व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये. नवी मुंबईकरांनी सातत्याने ना. गणेश नाईकांची पाठराखणच केलेली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून आजतागायत त्यातील कारभारावर ना. गणेश नाईकांचाच अंकुश राहीलेला आहे. मग आज जन्मदिवस २०मे. तथापि १९ तारखेला मध्यरात्री १२ वाजले आणि २० मेला जशी सुरूवात झाली, त्याच क्षणी सारसोळेच्या युवा ग्रामस्थांनी सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे चिटणिस मनोज मेहेर यांच्यासोबत नामदेव भगत यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी मनोज मेहेर यांच्यासमवेत नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, सचिव सुजित शिंदे, सारसोळे गावचे गोविंद मेहेर, अर्जुन मढवी, राजेश मेहेर, थापा नेपाळी, गणेश इंगवले आदी उपस्थित होते.
नामदेव भगत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यावर मनोज मेहेर यांनी लाडू भरवून नामदेव भगत यांचे तोंड गोड केले. यावेळी नामदेव भगत यांचे कडवट समर्थक तुकाराम कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदेव भगत यांनी समाजसेवा निस्वार्थीपणे करत गेल्यास जनता आपल्या पाठीशीच उभे राहत असल्याचे सांगून चांगली संगत आणि चांगले संस्कार उभ्या आयुष्यात अडीअडचणीच्या काळातही आपणास मदत करत असल्याचे सांगितले.
सध्याच्या राजकीय घडामोडीवर चर्चा करत काम करत रहा आणि पक्षसंघटनेशी प्रामाणिक रहा, असा मोलाचा सल्ला नामदेव भगत यांनी यावेळी दिला.
यावेळी नामदेव भगत यांना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली.