नवी मुंबई – मनविसे सांस्कृतिक विभागाकडुन नवी मुंबई कार्यक्षेत्रात सातत्याने विविध कार्यक्रम राबविले जात असून जिल्हाध्यक्ष अमर पाटील व उपजिल्हाध्यक्ष विवेक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई अध्यक्ष गिरीराज दरेकर यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळीच संघटनाबांधणी पहावयास मिळत आहे. मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांच्या मार्गदर्शनानंतर एक वेगळाच उत्साह मनविसे सांस्कृतिकच्या पदाधिकार्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सांस्कृतिक सानपाडा विभागाच्या वतीने मंगळवारी नवी मुंबई महानगर पालिकेच्या तुर्भे विभाग अधिकार्यांना सानपाडा विभागाचा पावसाळी पाहणी दौर्यासाठी निमंत्रण देण्यात आले. यावेळी मनविसे सांस्कृतिकचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, मनसेचे शाखा अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, विभाग अध्यक्ष विनोद हांडे, उपविभाग अध्यक्ष अमन गोळे, उपविभाग अध्यक्ष सुबोध गडेकर, शाखा अध्यक्ष श्रीकांत आतकरी, शाखा अध्यक्ष राहुल तनपुरे, शाखा अध्यक्ष रविकुमार झेंडे उपस्थित होते.
मुसळधार पावसामुळे सध्या सानपाड्यातील नागरिकांना अनेक नागरी समस्या भेडसावत आहेत.त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत चालली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हा पावसाळी पाहणी दौरा आयोजित केला असल्याचे मनविसे सांस्कृतिकचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी सांगितले.तसेच या आठवड्यात सानपाडा विभागाचा पावसाळी पाहणी दौरा करणार असल्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकारयानी दिले.