नवी मुंबई महापालिकेतील कारभाराचा जेव्हा कधी तटस्थपणे इतिहास लिहीला जाईल, त्यावेळी लिखाण करणार्यालाही महापालिकेच्या तिसर्या सभागृहात वावरणार्या संदीप नाईक या नगरसेवकाच्या, स्थायी समिती सदस्याच्या आणि स्थायी समिती सभापतीच्या अर्थात नवी मुंबईच्या संदीप नाईकांची सुवर्णाक्षरात दखल ही घ्यावीच लागेल. काही काही माणसांना पदामुळे शोभा येते, पद गेल्यावर त्या माणसांना कोणी विचारतही नाही. याउलट काही माणसांमुळे, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुुळे त्या पदांना शोभा येत असते. याच दुसर्या पठडीत संदीप नाईक यांचा समावेश निश्चितच करावा लागेल.
महापालिकेच्या सभागृहातून संदीप नाईकांनी ‘एक्झिट’ घेवून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी स्थायी समितीचा कारभार कसा हाकावा आणि स्थायी समितीचा सभापती कसा असावा याचे दाखले म्हणून संदीप नाईकांच्या महापालिका कामकाजाकडे एक आदर्श म्हणून आजही पाहिले जात आहे. महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यापासून १९९५ पासून ते आजतागायत स्थायी समिती सभापती म्हणून नवी मुंबई स्तरावरील अनेक स्थानिक रथी-महारथींनी तो मान भूषविला. परंतु स्थायी समिती सभापतीपदाला जनसामान्यात खर्या अर्थांने ‘ग्लॅमर’ मिळवून दिलेे ते केवळ आणि केवळ संदीप नाईकांनीच. स्थायी समितीचा कारभार, त्या ठिकाणी मंजूर होणारे ठराव यामुळे काजू-कतरी देण्याघेण्याच्या प्रसंगामुळे स्थायी समितीविषयी राजकीय प्रगल्भता असणार्या नवी मुंबईकरांमध्ये फारसे आस्थेवाईकपणे पाहिले जात नाही. पण हे चित्र संदीप नाईक महापालिकेच्या तिसर्या सभागृहात वावरत असताना त्यांनी बदलले. स्थायी समितीचा कारभार हा टक्केवारीसाठी नाही तर जनसामान्यांच्या समस्या सुधारण्यासाठी, त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ओळखला जावा यासाठी संदीप नाईकांनी आपल्या कृतीतून नवी मुंबईतील राजकारण्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालून दिले आहे.
संदीप नाईकांनी महापालिकेच्या तिसर्या सभागृहात प्रवेश केला, त्यावेळी सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहूमत होते. सभागृहात आल्याबरोबर स्थायी समितीचे सभापतीपद मिळविणे त्यांना अशक्य नव्हते. पण कोणतीही गोष्ट समजून उमजून घेतल्याशिवाय त्याचा कार्यभार स्वीकारायचा नाही आणि कार्यभार स्वीकारला तर त्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही संदीप नाईकांची कार्यप्रणाली आहे. संदीप नाईकांनी सुरूवातीची दोन वर्षे स्थायी समिती सदस्य म्हणून काढताना संदीप नाईकांनी स्थायी समिती कारभाराचा आणि पालिका प्रशासनाचा, अधिकार्यांचा, खाचखळग्यांचा जवळून अभ्यास केला. संदीप नाईक हे सातत्याने नव्याचा शोध घेत असतात.
तिसर्या सभागृहातील तिसरे स्थायी समिती सभापती म्हणून संदीप नाईकांनी ज्यावेळी सूत्रे हातात घेतली, त्यानंतरच्या तीन वर्षात स्थायी समिती सभापती काय करू शकतो, हे त्यांनी नवी मुंबईकरांनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला आपल्या परिश्रमातून दाखवून दिले. वातानुकूलित कार्यालयात बसून पालिका प्रशासनातील अधिकार्यांनी दिलेल्या आकडेवारीवर विसंबूून कारभार हाकण्याच्या प्रथेला छेद देत स्थायी समिती सभापतींनी प्रत्यक्षात नवी मुंबईकरांमध्ये जावून कारभार करावा, याचा उत्तम पायंडाच संदीप नाईकांनी आपल्या कामकाजातून घालून दिला.
स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झाल्यावर संदीप नाईकांनी ‘सभापती आपल्या प्रभागात’ हे अभियान राबविले. या अभियानाच्या माध्यमातून नवी मुंबई पायाखालून घालताना, प्रभागाप्रभागात पायपीट करताना त्या त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नागरी सुविधा कशा प्रकारे पुरविल्या जातात, नागरी समस्यांचे किती प्रमाणात निवारण होते. पालिकेच्या कामकाजावर नवी मुंबईकर खरोखरीच समाधानी आहेत का याचा आढावा संदीप नाईकांनी जवळून घेतला.
पावसाळीपूर्व कामांना पालिका प्रशासनामध्ये आणि नवी मुंबईकरांमध्ये कितपत महत्वाचे स्थान आहे, हे संदीप नाईकांमुळेच नवी मुंबईकरांना समजले आणि जवळून उमजलेसुध्दा. पावसाळीपूर्व कामांना किती खर्च झाला यावरच स्थायी समितीच्या बैठकांमध्ये मंजूरी मिळायची. परंतु संदीप नाईकांनी यावर समाधान न मानता प्रशासनाने सादर केेलेेल्या कागदोपत्रीच्या माहितीवर विसबूंन न राहता पावसाळी पूर्व कामांचादेखील प्रभागाप्रभागात जावून आढावा घेतला. गटारे, नाले, डोंगराळ विभाग, स्लम एरिया, विविध गृहनिमार्र्ण सोसायट्यांचा परिसर, बैठ्या चाळी, होल्डिंग पॉड, खाडीतील झडपा आदींची पाहणी केली. पाण्याचा निचरा कसा होईल, कचरा चोकअप झाल्यावर पयार्र्यी यंत्रणा काय आहे, पाणी तुंबल्यावर नवी मुंबईकरांना किती मिनिटात आणि किती सेंकदामध्ये दिलासा देवू शकतो याची सर्व उजळणी संदीप नाईकांनी प्रभागाप्रभागात जावून घेतली.
खाडीअर्ंतगत भागात जावून पाणी येण्याच्या जाण्याच्या मार्गाची पाहणी करणारे संदीप नाईक हे एकमेव स्थायी समिती सभापती आहेत. संदीप नाईकांचा पालिका सभागृहातील वावर हा उक्तीने नाही तर त्यांच्या कृतीने प्रसिध्द झाला आहे. नालेसफाई याबाबत संदीप नाईक गेल्या काही वर्षापासून अगदी विद्यार्थी चळवळीपासून दक्ष आहेत. स्थायी समिती सभापती असताना ३ ऑगस्ट २००७ रोजी वाशीतील नाला तुंबला असताना वाशी सेक्टर १७ मधील एसएससी बोर्ड कार्यालयाजवळील नाल्यात छातीएवढ्या पाण्यात सर्वप्रथम उतरून तुंबलेला कचरा काढण्यास त्यांनी सुरूवात करून त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणार्या उपस्थित राजकारण्यांच्या आणि पालिका प्रशासनातील अधिकार्यांच्या डोळ्यात या नवी मुंबईच्या ओबामाने चांगलेच झणझणीत अंजन घातलेे.
संदीप नाईकांच्या मित्रपरिवारामध्ये आपणास मध्यमवर्गीय, गोरगरीब, तळागाळातील घटकांचा विशेषत: सिडको सदनिकेतीलच घटकांचा प्राधान्याने समावेश झालेेला पहावयास मिळतो. सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीतील समस्यांबाबत आजवर नेहमीच चर्चा झालेेली पहावयास मिळते. पण चचार्र् न करता थेट कृती कशी करावी याचा आदर्शच संदीप नाईकांनी आपल्या कारभारातून पालिका सभागृहाला दाखवून दिला. पूर्वी केवळ कंडोनिअमअर्ंतगत कामाबाबत चर्चा व्हायची. मोफत की नाममात्र शुल्क यावर चर्चासत्र घडायचे. पण सिडकोच्या सोसायट्यांमध्ये राहणारे गोरगरीब, मध्यमवर्गीय रहीवाशी सर्वप्रथम माझे नवी मुंबईकर आहेत. तेदेखील महापालिकेचे करदाते आहेत. त्यांनाही नागरी सुविधा मिळाल्याच पाहिजेत. नवी मुंबईच्या प्रवाहात त्यांचेही अस्तित्व असल्याने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातूनच त्यांची सर्व कामे मोफत झालीच पाहिजेत यासाठी संदीप नाईकांनी पाठपुरावा केला. कंडोनिअमअंतगर्र्त कामे महापालिका प्रशासनानेच मोफत करावीत यासाठी महापालिका सभागृहात ठराव मंजूर करून मंत्रालयीन पातळीवरूनदेखील त्याला संदीप नाईकांनी मान्यता मिळविली. मंत्रालयीन पातळीवरून या ठरावाला सहजासहजी मान्यता नाही मिळाली. वर्ष-सव्वा वर्ष या संदीप नाईकांना सातत्याने चपला झिजवाव्या लागल्या. एकवेळ अधिकारी मंत्रालयात जाणार नाहीत पण संदीप नाईकांनी सातत्याने जावून आमच्या कंडोनिअम अर्ंतगतच्या ठरावाचे काय झाले अशी विचारणा केली. संदीप नाईकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि परिश्रमामुळेच या ठरावाला अखेर मंत्रालयीन पातळीवरूनही मान्यता मिळाली.
सिडकोतील सदनिकाधारक गोरगरीब बहूजन वर्गातील अल्प उत्पन्न गटातील आहेत. सोसायटी आवारातील मल:निस्सारण वाहिन्या आणि जलवाहिन्या बदली करणे त्यांना शक्य होणार नाही हे संदीप नाईकांनी जवळून पाहिले होते. त्यामुळेच त्यांनी सिडकोच्या सदनिकाधारकांसाठी न थकता पाठपुरावा केला. आज नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सिडको वसाहतीमध्ये मोफत मल:निस्सारण वाहिन्या बदली केल्या आहेत, जलवाहिन्या बदली केल्या आहेत. पेव्हर ब्लॉक बसवून दिलेे आहेत. पेव्हर ब्लॉॅक बसल्याने सिडकोचा सदनिकाधारक तळमजल्यावर आल्यावर पाऊसामध्येही त्यांच्या पायाला पूर्वीसारखा चिखल लागत नाही. हे सर्व साध्य झाले ते केवळ संदीप नाईकांच्या परिश्रमामुळे आणि जनकल्याणकारी दृष्टीक्षेपामुुळेच.
४ ऑगस्ट हा आमदार संदीप नाईकांचा जन्मदिवस. संदीप नाईकांच्या कार्याचा आलेख हा सातत्याने गरूडभरारी घेणाराच आहे. या माणसाला बहूजनामध्ये, गोरगरीबांमध्ये वावरण्यास आवडते. श्रीमतांची कामे कोणीही करतो, पण गरीबांकडे लक्ष कोण देणार ही संदीप नाईकांची उत्तरे पाहिल्यावर ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कायापालट आणि गोरगरीब, बहूजनांची प्रगती निश्चित आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाचीही गरज नाही.
– रामशेठ विचारे
माजी सभापती – शिक्षण मंडळ
नवी मुंबई महानगरपालिका.