दिपक देशमुख
नवी मुंबई : सीबीडी वार्ड क्रमांक ८४ येथे माजी खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. ज्यामध्ये प्रामुख्याने सेक्टर २ मध्ये नवीन मलनिःसारण वाहिनी टाकणे, आंबेडकर उदयानाचे सुशोभीकरण करणे, चाळींच्या आतील व प्रभागातील उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण करणे तसेच सेक्टर ८ आणि २ येथे निवारा शेड उभारणे या कामांचा समावेश आहे.
सदर, विकासकामे शासनाच्या दरबारात अडकली होती. परंतु, लोकसभेच्या निवडणुकीच्या कालावधीत संजीव नाईक यांनी येथील स्थानिक रहिवाश्यांना वचन दिले होते. त्यांतर्गतच ही कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीकोनातून वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत स्थानिक नगसेवक व राष्ट्रवादीचे मनपा पक्षप्रतोद विनीत पालकर यांनी व्यक्त केले. ही विकासकामे व्हावी यासाठी पालकमंत्री गणेशजी नाईक व माजी खासदारांनी अनेकवेळा शासन दरबारी आवाज उठविला तर संजीव नाईक यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून ही विकास कामे, मंजूर करून निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण केले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मोतीराम पालकर यांनी सांगितले. तसेच, विकासकामे मनपामार्फत लवकर व्हावी यासाठी स्विकृत व ज्येेष्ठ नगरसेवक साबू डॅनिअल यांनी नवी मुंबई महापालिकेत पाठपुरावा केला. सदर, विकासकामे व्हावी यासाठी युनिक फ्रेंड्स सर्कल व ए टाईप ओनर्स असोसिएशन (सेक्टर २) यांनी स्थानिक नगरसेवक यांच्याकडे विकासकामे होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले व मागणीचा पाठपुरावा केला. यावेळी संजीव नाईक यांनी सेक्टर २ येथील पुरातन अलबेला हनुमान मंदिर येथे श्रावणी मास हरीनाम सप्ताहास भेटही दिली.
यावेळी संजीव नाईक यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवक व राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विनीत पालकर, स्वीकृत नगसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बेलापूर तालुकाध्यक्ष साबु डॅनिअल, राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे मोतीराम पालकर, माजी नगरसेवक अशोक गुरखे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस इजाज खान, पंचायत राज जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हासचिव तुषार पवार, युनिक फ्रेंडस सर्कल संस्थेचे खजिनदार रमेश हुलवळे, जेष्ठ कार्यकर्ते समाजसेवक अप्पा दाभोळकर, माध्यमिक शिक्षण समिती सदस्य महेंद्र शेलार, उमेश पाटील व इतर मान्यवर, कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.