अनुराग वैद्य
नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघातील वाशी बिभागात जनसंपर्काच्या बाबतीत शिवसेनेने सोमवारी सकाळी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेवून आपल्या जनसंपर्कास व प्रचारास सुरूवात केली आहे. व्यापारी वर्गाकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वाशीतील शिवसैनिकांचा व पदाधिकार्यांचा उत्साह दुणावल्याचे पहावयास मिळत आहे.
शिवसेनेने बेलापुर मतदारसंघात उपनेते व नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा यांना उमेदवारी देवून सर्वपक्षीयांसमोर कडवट आव्हान निर्माण केले आहे. सोमवारी सकाळी शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांनी वाशी विभागातील व्यावसायिकांच्या दुकानादुकानांमध्ये भेटी घेवून आपल्या प्रचारास सुरूवात केली. विजय नाहटा यांच्या भेटीअभियानात शिवसेना शहरप्रमुख विजय माने, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख के. एन.म्हात्रे, विभागप्रमुख श्रीकांत हिंदळकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेविका आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भेटीगाठीदरम्यान दुकानांदुकानांमध्ये व्यावसायिकांनी नाहटा यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. व्यापारी नंतर घरटी अभियान व चौकसभांचा धुराळा आदी शिवसेनेचे नियोजन पाहता बेलापुर मतदारसंघावर २००४ नंतर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केल्याचे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पहावयास मिळत आहे.