संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : मान्सूनपुर्व कामाचा आढावा तथा महापालिका हद्दीतील लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची पाहणी करण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. ६) ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे परिसराचा पाहणी दौरा केला. आपल्या पाहणी दौर्याची सुरुवात त्यांनी दिघा विष्णुनगर-सुभाषनगर या ठिकाणांपासून केली. यावेळी नाल्यांची पाहणी करत असताना परिसरात कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने तातडीने विभाग अधिकारी गणेश आघाव यांना परिसर स्वच्छतेते निर्देश दिले.
आ. नाईक यांनी ऐरोली से. ३ मधील श्रीराम शाळेजवळ असणार्या मोठ्या नाल्यांची पाहणी केली. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्याकडे महावितरणच्या गलथान कारभाराचे गार्हाणे मांडले. उघड्या विद्युतवाहिन्या आणि नाल्यातून जाणारे पाणी यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. येथील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले. त्यानंतर ऐरोली से १५ येथील जॉगिंग ट्रॅकची पाहणी करत ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी जॉगिंग ट्रॅकजवळील बैठकी आसनांवर निवाराछत्री बसविण्याची मागणी केली. तसेच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे भरविण्याची मागणीही केली. यावर नागरिकांच्या मागणीनुसार लवकरच रोजगार मेळावा आयोजित केला जाईल, असे आ. नाईक यांनी सांगितले.
घणसोली गावाच्या मुख्य नाल्याची पाहणी करत असताना स्थानिक नगरसेविका मोनिकाताई पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेवक हरीष वाघमारे, माजी नगरसेवक संजय पाटील व इतर ग्रामस्थांनी नाल्याचा पुल हा अरुंद असल्याची तक्रार केली.
या ठिकाणी मोठा पुल निर्माण करण्याची मागणी केली. त्यानुसार आमदार निधीतून या ठिकाणी नागरी विकासकामे होतील, असे घणसोली घरोंदा-सिम्पलेक्सला जोडणार्या मुख्य नाल्याची पाहणी करत असताना नागरिकांनी एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. या दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठवणार असल्याचे आ. नाईक म्हणाले. कोपरखैरणे से २९ च्या मुख्य नाल्यातील गाळ काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या दौर्याविषयी आमदार संदीप नाईक यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, नियमित पावसाळा सुरु होण्याअगोदरच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली आहे. पाऊस अवेळी पडत असल्याने महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी तथा पावसाळा काही दिवसांवर आल्याने महापालिकेचे संथ गतीने चाललेले काम हे जलदगतीने व्हावे याकरिता आपण प्रयत्न करणार आहोत. या दौर्यादरम्यान दिघा विभागात स्वच्छतेचा अभाव ऐरोलीमध्ये नाल्यांची साफसफाईचा अभाव तथा महावितरणच्या उघड्या केबल, घणसोली मध्ये एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरो१/२याच्या समस्या, कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये साचलेला गाळ अशा अनेक समस्या जाणविल्या असून या समस्यांविषयी महापालिका आयुे दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे. कमी कालावधी असल्याने साफसफाईच्या कामाला गती मिळण्यासाठी कामगार व आधुनिक यंत्रणा जास्त प्रमाणात वापरण्यास सुचविणार आहे. तसेच येत्या २ दिवसामध्ये या संदर्भात विभाग अधिकार्यांची एक बैठक आयोजित करु, असे आ. नाईक म्हणाले.
आ. नाईक यांच्या पाहणी दौर्यादरम्यान स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र बोरकर, स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र पवार, कनिष्ठ अभियंता सुहास टकले, ऐरोलीमध्ये माजी स्वीकृत नगरसेवक जब्बार खान, समाजसेवक नरेंद्र कोटकर, राजू सूर्यवंशी, दीपक पाटील, जितेंद्र पारेख, जयवंत भंडारी, सिदरा खान, अनिल नाख्ते, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेवक सीताराम मढवी, भरत मढवी, विभाग अधिकारी बाळकृष्ण (बाळा पाटील) पाटील, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी शेकडे, नगरसेविका वैशाली म्हात्रे, नगरसेवक लीलाधर नाईक, स्वच्छता अधिकारी पोटफोडेे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.