संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : पारंपारिक चैत्र मेळ्याला नवी मुंबईकरांचा उत्साही प्रतिसाद पाहून, सिडको अर्बन हाटतर्फे या मेळ्याचा कालावधी १० मे २०१५ पर्यत वाढविण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना सिडको अर्बन हाट, बेलापूर, नवी मुंबई येथे आपल्या पसंतीचे पारंपारिक कपडे, दागिने आणि सजावटीची उत्पादने योग्य दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
विविध राज्यांतील कुशल कारागिरांकडून हस्तकला आणि हातमागाच्या उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित कऱण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पंजाबमधील पारंपारिक फुलकारी ओढण्या, ड्रेस मटेरिअलस व साड्या, बिहारमधील खादी सिल्क साड्या आणि ड्रेसेस, गोव्यातील क्रोशाचे स्कार्फ, जॅकेटस व ड्रेसेस, पश्चिम बंगालमधील वैविध्यपूर्ण चादरी, उत्तर प्रदेशातील चिकनचे ड्रेस मटेरिअलस व ओढण्या, वाराणसीतील बनारसी साड्या व कुशन कव्हर्स यांसारखी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. अलंकारप्रेमींसाठी राजस्थानी पद्धतीचे व ट्रेंडी लूक देणारे विविध प्रकारचे कानातले, नेक पिसेस, बांगड्या, अंगठ्या व टेरिकोटा दागिने प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच पेपर क्विलींग ज्वेलरीमध्ये नवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत.
पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम व उत्तर प्रदेशातील कारागिरांकडून बांबूचे फर्निचर, लाकूड व टेरिकोटाची उत्पादने प्रदर्शित कऱण्यात आली आहेत. तसेच कलाप्रेमी राजस्थानी, वारली, मधुबनी व पटचित्रे खरेदी करु शकतात. याशिवाय पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश व इतर राज्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या चामड्याच्या लेडिज बॅग्ज, शूज, खेळणी व जेन्टस वॉलेट व्रिकीसाठी ठेवण्यात आली आहेत. हातमाग व हस्तकला कलाकृतींशिवाय विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून अर्बन हाटच्या प्रेक्षागृहात रविवार ११ मे रोजी नवी मुंबईतील स्थानिक कलाकारांकडून संध्याकाळी नाटकाचा प्रयोग सादर कऱण्यात येणार आहे.
चैत्र मेळ्यानंतर १२ मेपासून गुजरात फेस्टीवलचा आरंभ होणार आहे. जर एखाद्या शाळांना, महाविद्यालयांना, सेवा भावी संस्थांना अथवा सांस्कृतिक संस्थांना अर्बन हाटच्या प्रेक्षागृहात सांस्कृतिक उपक्रम आयोजित करायचे असतील अथवा कोणाला स्टॉल बुक करावयाचा असेल तर त्यांनी अर्बन हाटच्या व्यवस्थापकांशी सकाळी ११ ते रात्री ७ या कालावधीत संपर्क साधावा. स्टॉल बुक करताना कमीतकमी १० आणि जास्तीत जास्त ३० दिवसांकरता घ्यावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी.