सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील महापालिका प्रभाग 85 व 86 मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये गुरूवारी सकाळी कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभाग 85च्या नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील व 86च्या नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर आणि स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे उपस्थित होते.
प्रभाग 85 व 86 मधील नेरूळ सेक्टर सहा परिसर व सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील व नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर यांनी कचराकुंड्या स्थानिक रहीवाशांच्या स्वाधीन केल्या. यावेळी गृहनिर्माण सोसायटीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट 15 वरील सिडकोच्या शिवम सोसायटीतून कचराकुंडी वितरणास सुरूवात झाली. यावेळी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक मारूती बोरकर, तेजस मुनवर, रेश्मा मुनवर, सौ. पटेल, सौ.धेंडे, सौ. नायर यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी स्वच्छतेचे महत्व विषद करताना पावसाळ्याच्या तोंडावर घ्यावयाची काळजी विस्तृतपणे सांगितली. त्यानंतर सागरदीप सोसायटीमध्ये अध्यक्ष पाली व अन्य रहीवाशांना कचराकुंड्या स्वाधीन करण्यात आल्या. त्यानंतर दत्तगुरू, एव्हग्रीन असे करत सेक्टर सहा व सारसोळे गावात कचराकुंड्या वितरीत करण्यात आल्या.
या कार्यक्रमात माजी नगरसेवक सुरज पाटील, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, विरेंद्र लगाडे, सौ. कुंभारकरताई, तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, दिपक म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, अशोक आतकरी यांच्यासह नेरूळ सेक्टर सहामधील गृहनिर्माणस सोसायटीचे पदाधिकारी व सारसोळेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.