नवी मुंबई : ३१ मे हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे ,जगभरात लाखो व्यक्तींचा मृत्यु दरवर्षी तंबाखू सेवना मुळे होतो.
नवी मुंबईमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यामुळे नावाजलेल्या आणि जनसामान्यांमध्ये कार्यरत असलेल्या ‘ड्रीमनेहा ट्रस्ट’ हा उपक्रम साजरा करण्यासाठी चांगला प्रयत्न करताना दिसत आहे. किमान या दिवशी तरी नवी मुंबईमध्ये तंबाखुु विक्री बंद असावी यासाठी संस्थेने नवी मुंबई व्यापारी महासंघाचे महासचिव प्रमोद जोशी यांची भेट घेतली असता जोशी यांनी संस्थेला शाश्वती दिली आहे की ३१ मे रोजी नवी मुंबईतील सर्व होलसेल तंबाखु विक्री दुकाने बंद असतील.याच बरोबर ट्रस्टकडून यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोलीतील आ. संदीप नाईक, भाजपाच्या बेलापुरमधील आ.मंदा म्हात्रे, नवी मुंबई महापौर सुधाकर सोनावणे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान सर्व मान्यवरांनी संस्थेला पाठिंबा दर्शविला. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, सचिव विकास बोंबे,खजिनदार संदेशदादा डोंगरे, टर्फनील गोम्स,अंकुर सोनावणे, राहुल भोर, अनिकेत पालकर, अर्जुन देवेन्द्र आदी सभासद उपस्थित होते.