नवी दिल्ली : तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर मागविलात आणि तुमची फसवणूक झाली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आता सिलिंडर आणणार्या कर्मचार्याला आपल्या सोबत वजन काटा आणावा लागणार आहे. हा वजन काटा आणला नाही तर संबंधित कर्मचार्यावर कारवाई करण्याचे संकेत केंद्रातील सरकारने दिले आहेत.
सिलिंडर घरपोच करताना काही कर्मचारी गॅसची चोरी करतात. परिणामी घरगुती सिलिंडरमधील गॅस कमी भरतो. याबाबत अनेक तक्रारी होत्या. आमच्या घरचा सिलिंडर लवकर संपला. आणखी काही दिवस जायला हवे होते, अशी गृहणींची चर्चा नेहमी ऐकायला मिळते. ही चर्चा आता ऐकायला मिळणार नाही. दरम्यान, सरकारने सिलिंडरबरोबर वजन काटा बंधनकारक केल्याने गॅस चोरीला जात होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सिलिंडर घरपोच पोहोचविणारे आपल्यासोबत वजन काटा नेत नव्हते. त्यामुळे ग्राहकाला आपली फसवणूक झाली आहे की नाही, याबाबत काहीही माहिती मिळत नव्हती. आता वजन काटा बंधनकारक केल्याने ही फसवणूक टळणार आहे.
कायदा माप पद्धती विभागाच्या नियमानुसार गॅस सिलिंडर पोहोचवणार्या कर्मचार्यांना वजन करणारे उपककरणाद्वारे गॅस सिलिंडरचे वजन करुन देण्याची गरज आहे. जर 14.2 किलोग्रॅम पेक्षा कमी वजन मिळाले तर संबंधित गॅस एजन्सीविरोधात तक्रारही दाखल करता येणार आहे. गॅस सिलिंडर कमी वजनाचा दिला म्हणून ही तक्रार दाखल करता येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देऊन पेट्रोलियम मंत्रालयाने तेल कंपनिनांना निर्देश दिलेत. एलपीजी सिलिंडर पोहोचविणार्या कर्मचार्यासोबत वजन मोजण्याचे उपकरण आवश्यक आहे आणि त्याने ग्राहकासमोर सिलिंडरचे वजन करुन देणे बंधनकारक आहे.