नवी मुंबई : राज्याच्या सहकारक्षेत्रात नावाजलेल्या श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाकरता 12 जुलै रोजी निवडणूक होत असून आमदार शरद सोनावणे, शंकर पिंगळे आदी दिग्गजांच्या पॅनलविरोधात श्री कुलस्वामी खंडेराय सहकार पॅनल कपबशी निवडणूक चिन्हावर रिंगणात सहभागी झाल्याने निवडणूकीत चुरस वाढली आहे. श्री कुलस्वामी खंडेराय सहकार पॅनलकडून कपबशी निवडणूक चिन्हावर स्वत: संदीप नाईक आपले नशिब आजमावत आहेत. श्री कुलस्वामी खंडेराय सहकार पॅनल कपबशी निवडणूक चिन्हावर संदीप नाईक, शामराव मोहीते, सतीश डोके, तानाजी शिंदे, बबन चव्हाण, अनिता हांडे, सुलभा पवार, अर्जुन आव्हाड, मसनु कांबळे, तुषार शिंदे, लक्ष्मण पोखरकर आदी मंडळी आपले नशिब आजमावत आहेत.
श्री कुलस्वामी खंडेराय सहकार पॅनल श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडीट सोसायटीला 1000 कोटींच्या खेळते भागभांडवलापर्यत घेवून जाणार, सभासदांच्या मागणीनुसार वाढत्या औद्योगिक शहरांमधून व गावांमधून शाखा वाढविणे, अधिकाधिक ठेवीव गरजूंना त्वरीत कर्ज उपलब्ध करण्यासाठी सुलभ पध्दतीचा अवलंब करणे, संस्थेची अनुत्पादीत कर्जे (एन.पी.ए) शुन्य टक्क्यावर आणण्याचा प्रयास केला जाणार, शाखातंर्गत व्यवहारात सुलभता आणू व एटीएम सुविधा सुरू करण्याचा प्रयास केला जाणार, संस्थेतील महिला सभासदांना महिला बचत गटामार्फत व्यवसायासाठी प्रोत्साहीत करण्यात येईल, शेतकरी बांधवांना हंगामी पीक कर्ज देण्याचा आणि त्यांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयास केला जाणार, संस्थेचे सक्षम ठेवीदार तसेच कर्जदार सभासदांना संस्थेशी व्यवहार वाढविण्यास प्रेरीत केले जाणार, शाखा स्तरावर उत्कृष्ठ काम करण्यासाठी शाखांना उत्कृष्ठ शाखा पुरस्कार देवून त्यांना उत्तेजित करण्यात येईल, संस्थेतील वसूली प्रतिनिधींना त्यांच्या उत्कृष्ठ कामासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल, वसूली प्रतिनिधींसाठी अधिकाधिक सेवा मिळवून देण्यासाठी अभ्यासपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, संस्थेच्या सभासदांना पारदर्शक, गतीमान व सुहास्य सेवा देण्यात येईल, आधुनिकतेशी सांगड घालत प्रत्येक शाखा स्वमालकीच्या जागतेच सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार, सभासद -कर्मचारी, वसुली प्रतिनिधींंची शृंखला निर्माण होण्यासाठी नवीन योजना आखण्यात येतील अशा विविध मुद्यांचा वचननाम्यात समावेश करण्यात आला आहे. श्री. कुलस्वामी पतसंस्थेचे 75 हजार सभासद, 15 कोटी रूपये भाग भांडवल, 300 कोटी रूपयांच्या ठेवी, 245 कोटी रूपयांचे कर्जवाटप, 18 कोटींचा निधी, 7 कोटी रूपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असून शहरी भागात 12 व ग्रामीण भागात 9 सुसज्ज संगणकीकृत शाखा आहेत. राज्यातील सहकार क्षेत्रात नावाजलेल्या कुलस्वामी पतसंस्थेच्या निवडणूकीकडे राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहीले आहे.