नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मन की बातचे चॅम्पियन असलेले मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मात्र मौन बाळगून आहेत या शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
जोपर्यंत वसुंधरा राजे, सुषमा स्वराज आणि शिवराज सिंग चौहान आपल्या पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत संसदेचे कामकाज होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेसच्या संसदीय बैठकीत सोनियां गाधींनी मोदी सरकारवर टीका केली. ज्यांनी यापूर्वी संसदेत गदारोळ घातला होता त्याच लोकांकडून आम्हाल आज उपदेश मिळत आहेत.
आधी राजीनामा नंतरच चर्चा ही सूत्री भाजपानेच बनवली होती. यूपीए सरकारच्या कार्यकालादरम्यान त्यांनी पाच वेळा ही सूत्री अवलंबली. आम्ही केवळ ते सूत्र अवलंबत आहोत. मोदींनी यावेळी अनेक आश्वासने दिली खरी मात्र ती पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरत आहेत.