भाग १ – कुरूक्षेत्र
महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या प्रचलित असलेल्या अवस्थेत नवी मुंबई शहराचे हितैषी म्हणून यादी करावयाची झाल्यास आमदार संदीप नाईकांचा क्रमांक हा नक्कीच पहिल्या स्थानावर असेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पडलेला दुष्काळ, समाजव्यवस्थेत घडणार्या दुर्घटना यामुळे संवेदनशील मनाच्या आमदार संदीप नाईकांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षीय पदाधिकार्यांना, नगरसेवकांना, समर्थकांना, हितचिंतकांना, मित्र परिवाराला पुष्पगुच्छही न आणण्याचे आवाहन केले होते. आपल्या प्रभागात लोकोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करण्याचे स्पष्टपणे निर्देश आमदार संदीप नाईकांनी जाहीररित्या दिले होते. तथापि आमदार संदीप नाईकांवर प्रेम करणार्यांनी पुष्पगुच्छ आणून आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. मोठ्या प्रमाणावर होर्डीग वाढदिवसाचे लावण्यात आले. झाले, आमदार संदीप नाईकांना सदैव पाण्यात पाहणार्यांची कोल्हेकुई सुरू झाली. अनधिकृत होर्डीग लागले, शहर बकाल झाले अशी चर्चा करण्यात आली. चर्चा करणार्यांना फारसा प्रतिसाद भेटला नाही. पेल्यातील वादळ पेल्यातच शमले. आमदार संदीप नाईकांना नवी मुंबईकर जाणतात आणि म्हणूनच ते आमदार संदीप नाईकांना मानतात. कोणी अनधिकृत होर्डीग लावले, वाढदिवसाला पुष्पगुच्छ आणले, यात आमदार संदीप नाईकांचा दोष काय? आमदार संदीप नाईकांचा दोष असेल तर तो हाच की या माणसाने गेल्या दीड दशकापासून आपल्या शरीरातील प्रत्येक श्वास नवी मुंबईच्या विकासाला समर्पित केला आहे. आमदार संदीप नाईकांचा दोष हाच आहे की नवी मुंबई शहर हिरवेगार करण्यासाठी ‘ग्रीन होप’च्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाला प्राधान्य दिले आहे. आमदार संदीप नाईकांचा दोष हाच की नवी मुंबईतल्या प्रत्येकाला रोजगार मिळावा, बेरोजगारीचा भस्मासूर संपुष्ठात यावा म्हणून हा माणूस सातत्याने नवी मुंबईकरांना रोजगार मिळावा म्हणून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे परिश्रम करत आहेत. असे अनेक दोष आमच्या आमदार संदीप नाईकांमध्ये असतील, तर आम्हालाच नाही तर समस्त नवी मुंबईकरांना आज आमदार संदीप नाईकांचा अभिमान आहे. आमदार संदीप नाईकांच्या नेतृत्वाने, कर्तृत्वाने, दूरदृष्टीने, जनसंपर्काने आणि पाठीशी वाढत चाललेल्या जनाधारांने नवी मुंबईच्या राजकारणातील रथी-महारथी, प्रस्थापितांमध्ये एक प्रकारची असूया निर्माण झाली आहे. संदीप नाईकांच्या नावाची काविळ त्यांना गेल्या काही वर्षापासून झालेली आहे. मोदी लाटेत रथी-महारथींचा, प्रस्थापितांचा पराभव होत असताना संदीप नाईकांनी ऐरोलीचा गड राखल्याने आणि त्यानंतर ऑक्टोबर २०१४ नंतर संदीप नाईकांनी ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आपल्या कार्यप्रणालीने जनसामान्यांची मने जिंकून घेतल्याने ऐरोली विधानसभा आपणास कदापि जिंकता येणार नाही हे कळून चुकल्याने आता आमदार संदीप नाईकांच्या पायवाटेवर अडथळे निर्माण करण्यासाठी ‘बालिश’ चाळे करण्याचा प्रकार काही घटकांनी केला. अर्थात त्यास जनसामान्यांनी गांभीर्याने न घेतल्याने असले ‘उद्योग’ करणार्यांचेच जनसामान्यांमध्ये ‘हसे’ उडाले आहे.
मोठ्या वटवृृक्षाखाली लहान झाडांची, वेलींची फारशी वाढ होत नाही, असे बोलले जाते. पण संदीप नाईक त्यास अपवाद ठरले आहेत. संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीचे एक विशेष आहे ते म्हणजे संदीप नाईक बोलत नाही, तर करून दाखवितात आणि नंतर त्यांच्या हातून घडलेली विकासकामेच जनसामान्यांकरता बोलकी ठरतात. मुळातच संदीप नाईक या माणसांचा पिंड राजकारणी नसल्याने स्वत: केलेल्या विकासकामांचे ‘मार्केटींग’ करण्याच्या प्रयत्नात ते कधीही समाधान मानत नाहीत. आपण लोकांची कामे करत राहणे, त्यांची कामे करण्यासाठीच त्यांनी आपणास निवडून दिलेले आहे, त्यांच्या चेहर्यावरील समाधान हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे आमदार संदीप नाईक नेहमीच सांगतात. तसे आमदार संदीप नाईक हे अबोल स्वभावाचेच. वाचाळपणा करणे, आश्वासन देवून लोकांना झुलवत ठेवणे हा संदीप नाईकांचा पिंडच नाही. संपर्कात आलेल्यांचे काम होत असेल तर स्पष्टपणे हो सांगणे, होत नसेल तर त्यांना स्पष्टपणे तशी कल्पना देणे हा संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीचा एक हिस्सा आहे.
संदीप नाईक हे त्यांच्या अभ्यासूवृत्तीसाठीचदेखील प्रसिध्द आहे. कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेण्यापूर्वी ते त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतात. त्या गोष्टीचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय परिणाम होतील याची ते चाचपणी करतात. प्रत्येक गोष्टीच्या खोलामध्ये जावून ते सर्व छाननी करतात. त्यामुळेच आजवर संदीप नाईकांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा त्यांच्या समर्थकांनीच नाही तर विरोधकांनीदेखील एकदा नाही तर शतदा विचार करणे आवश्यक आहे. संदीप नाईकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनकल्याणकारी आणि बहूजन वर्गाच्या हितासाठीच उपयुक्त असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
सन २०१० साली झालेल्या महानगरपालिकेच्या तिसर्या सार्वत्रिक निवडणूकीत लोकनेते गणेश नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित महापालिकेची धुरा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाधीन केली होती. सभागृहात स्पष्णपणे बहूमत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होते. याच निवडणूकीतून संदीप नाईकांनी महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये ९५ टक्के नगरसेवक हे कट्टर आणि कडवट नाईक समर्थकच होते. संदीप नाईकांना त्या परिस्थितीत ‘डे वन’पासून स्थायी समिती सभापतीपदाचा कारभार सांभाळण्यास कोणी आडकाठीही केली नसती. परंतु ‘पी हळद अन् हो गोरी’ असला प्रकार संदीप नाईकांनी उभ्या आयुष्यात केला नाही आणि ते करणारही नाहीत याची आम्हाला खात्री आहे. संदीप नाईकांच्या मनात काय चालले आहे, त्यांना आम्हाला काय सांगावयाचे आहे, हे आम्हाला सांगण्यासाठी त्यांना शब्दही उच्चारावयाची गरज नाही. त्यांची देहबोली आणि नजरेतील हावभावच आमच्याशी बोलके होतात. ईतके आज आम्ही त्यांच्यांशी एकरूप झालेलो आहोत.
महापालिकेच्या तिसर्या सभागृहात प्रवेश केल्यावर सभापती न होता स्थायी समितीचे सदस्य होण्याला त्यांनी प्राधान्य दिले. सलग दोन वर्षे सदस्य म्हणून त्यांनी स्थायी समितीच्या कारभाराचा अभ्यास केला. कारभारातले बारकावे जाणून घेतले. प्रशासनावर मांड ठोकायची असेल तर प्रशासकीय बारकावे आपणास माहिती असणे गरजेचे आहे हे त्या काळात अभ्यासावरून संदीप नाईकांना कळून चुकले होते. स्थायी समिती सदस्य म्हणून दोन वर्षाच्या कालावधीत संदीप नाईकांनी केलेला अभ्यास त्यांना नाही तर नवी मुंबईकरांकरीता उपयुक्त ठरला. स्थायी समितीचा कारभार महापालिकेच्या तत्कालीन ईमारतीमधील सातव्या मजल्यावरील वातानुकूलित कार्यालयात बसून न हाकता रस्त्यावर उतरून, नवी मुंबई शहरातल्या गल्लीबोळात फिरून, नाले-गटारे तुडवित, झोपडपट्टी परिसरात, डोंगराळ विभागात फिरून चालविला. नवी मुंबईच्या समस्या आणि नवी मुंबईला आवश्यक असणार्या सुविधा जाणून घेण्यासाठी संदीप नाईकांनी पायपीट करत नवी मुंबई पायाखालून घातली. चपला झिजविल्या. ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवित प्रभागाप्रभागातील नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेतले. संदीप नाईक हे स्थायी समिती सभापती झाल्यावरच पावसाळीपूर्व कामांचे महत्व नवी मुंबईकरांना, नवी मुंबईतील सर्वपक्षीय राजकारण्यांना, महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना संदीप नाईकांनी दाखवून दिले. पावसाळी पूर्व कामाचा आढावा त्यांनी महापालिका प्रशासनातील अधिकार्यांनी दिलेल्या कागदोपत्री माहितीवरून घेतला नाही. पालिका प्रशासनाने सादर केलेल्या माहितीवर संदीप नाईकांनी विश्वास न ठेवता नवी मुंबईची पायपीट करत ही कामे कितपत झाली आहेत याची खातरजमा करून घेतली. नालेसफाई कितपत झाली, गटारांचा-नाल्याचा चोकअप काढला आहे की नाही, सफाई झाली की नाही, तुंबलेला कचरा काढला की नाही, खाडीअर्ंतगत भागात ढाप्यांची डागडूजी झाली अथवा नाही याची प्रत्यक्षात घटनास्थळी जावून संदीप नाईकांनी खातरजमा करून घेतली.
नालेसफाईबाबत बोलणे अथवा महापालिका अधिकारी-कर्मचार्यांना धारेवर धरणे हे वातानुकूलित कार्यालयात बसून करणे संदीप नाईकांना जमले असते. पण संदीप नाईकांचा तो स्वभावच नाही. ३ ऑगस्ट २००७ रोजी नवी मुंबईत संततधार मुसळधार पाऊस सुरू होता. सर्वत्र पाणी साचले होते. वाशी सेक्टर १७ मधील एसएससी बोर्डाच्या कार्यासमोरील नाला तुंबला होता. नाल्यातील चोकअप काढून वेळीच सफाई झाली नसती तर वाशीत पाणी घुसण्याचा धोका होता. मुसळधार पाऊस. नाल्यात उतरण्याचे धाडस कोणी दाखवित नव्हते. अशावेळी अंगावर असलेल्या पांढर्या शुभ्र शर्टावरच आमदार संदीप नाईक नाल्यात उतरले. गळ्याएवढ्या पाण्यात जावून नालेसफाईला सुरूवात केली. मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी आणि संदीप नाईकांकडे निवेदन घेवून आलेले सानपाडा-पामबीच परिसरातील मनसेचे कार्यकर्ते-पदाधिकारी आजही त्या घटनेचे साक्षीदार आहेत.
कंडोनिअमअर्ंतगत सिडको वसाहतीमध्ये महापालिका प्रशासन मोफत कामे तत्कालीन परिस्थितीत करत नव्हती. नवी मुंबईतील सिडको वसाहतीमध्ये संदीप नाईकांचा आजही मित्रपरिवार विखुरलेला आहे. सिडको सदनिकाधारकांचे दु:ख आजही नवी मुंबईतल्या अन्य राजकारण्यांच्या तुलनेत संदीप नाईकांना अधिक माहिती आहे. मित्रपरिवाराच्या माध्यमातून सिडको सदनिकाधारकांचे जीवनमान, त्यांच्या अडचणी संदीप नाईकांनी जवळून पाहिल्या आहेत. सिडको सोसायट्या जुन्या झाल्याने त्यांच्या मल:निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्या बदली करणे आवश्यक होते. परंतु सिडको सदनिकाधारकांची गरीब परिस्थिती पाहता स्वखर्चाने मल:निस्सारण व जलवाहिन्यांची बदली करणे त्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे ‘‘सिडको वसाहतीमध्ये कंडोनिअमअर्ंतगत महापालिका प्रशासनाने मोफत कामे करावीत’’ असा ठराव संदीप नाईकांनी महापालिकेच्या तिसर्या सभागृहात मंजूर करून घेतला आणि मंत्रालयीन पातळीवर या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी पाठवून दिला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवून संदीप नाईक स्वस्थ बसले नाहीत. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंत्रालयीन पातळीवरून मंजुरी मिळावी याकरता संदीप नाईकांनी वर्षभर मंत्रालयाचे उंबरठे चढत आपल्या चपला झिजविल्या. या प्रस्तावाला सिडको सदनिकाधारकांसाठी मंजुरी मिळणे कसे गरजेचे आहे हे आमदार संदीप नाईकांनी मंत्र्यांना व संबंधित खात्याच्या मंत्रालयीन अधिकार्यांना पटवून दिले. अखेरीला संदीप नाईकांनी या प्रस्तावाला मंत्रालयीन पातळीवरून मंजुरी आणलीच. आज सिडकोच्या सोसायट्यांमध्ये मल:निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्या महापालिका प्रशासनाने मोफत बदली केल्या आहेत. कंडोनिअमअर्ंतगत सिडको वसाहतीमध्ये पेव्हर ब्लॉकही महापालिका प्रशासनाने बसविले आहेत. ही सर्व होत असलेली विकासकामे संदीप नाईकांच्या परिश्रमामुळेच शक्य झालेली आहेत, याची कृतज्ञ सिडको सदनिकाधारकांना निश्चितच जाणिव आजही असणार.
पुढे विधानसभा मतदारसंघाची राज्य शासनाने पुर्नरचना केली. अवाढव्य बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झाले. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ऐरोली व बेलापुर असे दोन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने संदीप नाईकांना विधानसभेची उमेदवारी दिली. महापालिका सभागृहाच्या माध्यमातून संदीप नाईकांनी केलेली विकासकामे, संदीप नाईकांनी केलेले परिश्रम नवी मुंबईकरांनी जवळून पाहिलेले असल्याने ऐरोली विधानसा मतदारसंघातल्या मतदारांनी नगरसेवक संदीप नाईकांना आमदार संदीप नाईक बनवून त्यांच्या कामकाजावर विश्वास दाखवित मतपेटीतून शिक्कामोर्तब केले.
पुढच्या भागात
पर्यावरणसंतुलनाचे, वृक्षसंवर्धनाचे चाहते असणारे संदीप नाईक