डेहराडून – हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी मोजण्यात आली आहे. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्कामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेत, मोकळ्या जागेत आश्रय घेतला. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे समजते.
यापूर्वी 10 ऑगस्टला हिमाचल प्रदेशासह दिल्लीला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वत रांगांमध्ये होता.