लासलगावमध्ये प्रतिक्विंटल कांदा 4900 रुपये
नाशिक : जेवणातील महत्वाचा घटक असलेल्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळयात पाणी आणले आहे. दिवसेंदिवस प्रतिकिलो कांद्याचे दर गगनाला भिडत चालले आहेत.
देशातील कांद्याची सर्वातमोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या लासलगावमध्ये प्रतिक्विंटल कांद्याचा भाव 4900 रुपये चालू आहे. बुधवारी प्रतिक्विंटल कांद्याचा दर 4500 रुपये होता. एकाच दिवसात कांद्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.
कांद्याची आवक घटल्यामुळे लासलगावमध्ये कांद्याच्या प्रतिक्विंटल दराने दोन वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. असंतुलित पावसामुळे खरीप हंगामातही कांद्याचे उत्पादन घटणार आहे.
त्यामुळे येणार्या दिवसामध्ये कांदा आणखी महाग होईल. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून कांद्याचे सर्वाधित उत्पादन घेतले जाते. मात्र अपुर्या पावसामुळे येथेही कांद्याचे उत्पादन कमी रहाण्याची शक्यता असून, या राज्यातील काही भागांमध्ये दृष्काळसदुश स्थिती आहे.