सुजित शिंदे : ७७१८०३६००७
नवी मुंबई : बोलण्यापेक्षा कृती करणे महत्वाचे आहे असा संदेश भाजपाचे तुर्भेतील नगरसेवक व महापालिकेतील गटनेते रामचंद्र घरत यांनी आपल्या कृतीतून स्पष्ट करत नवी मुंबईकरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
राज्यात यंदा कमी पाऊस पडल्याने १९७२ पेक्षाही महाभयावह दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. सोशल मिडीयावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घटकांकडून याबाबत उपदेशाचे डोस पाजताना आपल्याही ‘चमकेशगिरी’ची हौस भागविली जात आहे. परंतु सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह राहून अथवा जनजागृती करून दुष्काळग्रस्तांना फारसा उपयोग होणार नाही, हे जाणले नवी मुंबई महापालिकेतील भाजपा गटनेते व तुर्भेतील भाजपा नगरसेवक रामचंद्र घरत यांनी.
दुष्काळावर मात करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री निधीमध्ये पैसा असणे गरजेचे आहे, हे जाणून रामचंद्र घरत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मुख्यमंत्री निधीला एक लाख रूपयांची मदत केली आहे. रामचंद्र घरत यांच्या कृतीविषयी नवी मुंबईकरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.