: जगभरातील उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी ’मेक इन इंडिया’ सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती.
’मेक इन इंडिया’मध्ये जगभरातील तब्बल ६८ देश सहभागी होणार असून, ४९ देशांनी आपली औद्योगिक शिष्टमंडळे मुंबईत पाठवली आहेत. प्रत्येक दिवशी ५ ते ६ चर्चासत्रे, परिसंवाद, उद्योगांचे स्टॉल्स, देशोदेशींच्या उद्योगजगताचे शक्तिप्रदर्शन आणि या सर्वांना सामावून घेण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
’मेक इन इंडिया’ कार्यक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना आणि चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था संकटात असताना भारतातील नियंत्रकांच्या प्रभावी नियंत्रणामुळे कायम सावरली गेलेली भारतीय अर्थव्यवस्था या कार्यक्रमामुळे आणखी सक्षम होईल.
राज्यात एकूण ४.६ ६ लाख कोटी डॉलर रुपयांची गुंतवणूक येईल. बंदरे, उद्योग, वाहन आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक होईल. ३ ते ५ हजार एकर जागेवर सौरउर्जा प्रकल्प स्थापन होतील आणि परदेशी विद्यापीठे येथे शाखा उघतील असा फायदा राज्याला होऊ शकतो.
एकूण ६८ देशांचे ५ हजार प्रतिनिधी ’मेक इन इंडिया’त सहभागी होणार आहेत. त्यामध्ये १९० कंपन्या भाग घेत आहेत. देशातील १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि १३ कंद्रीय मंत्री या कार्यक्रमासाठी येणार आहेत. ४ देशांचे अध्यक्ष देखील यानिम्मित्त मुंबईत हजेरी लावणार आहेत.