महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम महेंद्रसिंग रामचंद्र बेनवाल (वय ५६) व सफाई कर्मचारी नरेश माफा मकवाना (वय ४५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत तक्रारदार व्यक्तीने आपल्या घरात दोन शौचालय बांधले आहेत. यासाठी त्याने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या दोन शौचालयाला प्रत्येकी २२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळविण्यासाठी सर्व्हे रिपोर्ट तयार करणे आवश्यक आहे. हा सर्व्हे रिपोर्ट बनविण्यासाठी तक्रारदाराकडे आले असता त्यांनी ६ हजार रुपये लाच मागितली. या नंतर तक्रारदाराने ५ हजार रुपये लाच देण्याचे मान्य करून याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याकडे तक्रार केली. आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यालयात तक्रारदार हे ५ हजार रुपये लाच देण्यासाठी मुकादम महेंद्रसिंग रामचंद्र बेनवाल यांच्याकडे आले असता पोलिसांनी बेनवाल याला सापळा रचून अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक राजेंद्र बागलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला.