*नवी, मुंबई युवा विद्यार्थी संघटनेची पालिका शिक्षण उपायुक्तांकडे मागणी.
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई युवा विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष योगेश शेटे यांनी पालिका शिक्षण उपायुक्तांकडे शनिवारी लेखी निवेदनाद्वारे केली.
यावेळी नवी मुंबई युवा संघटनेचे सरचिटणीस गणेश पालवे,नवी मुंबई युवा विद्यार्थी संघटनेचे शहर चिटणीस अजित हाके,बेलापूर विधानसभा अध्यक्ष अमन गोळे,बेलापूर विधानसभा चिटणीस सुबोध गडेकर,ऐरोली विधानसभा चिटणीस सोपान शेटे,उपशहर अध्यक्ष स्वप्निल भिलारे,मयुरेश चव्हाण,श्रीकांत अतकरी व संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत पवार,अक्षय कांबळे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगर पालिका शाळेतील बालवाडीच्या वर्गात शैक्षणिक वर्षाच्या जवळपास अखेरीस म्हणजे फेब्रुवारीत पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याने शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील दोन महिने बाकी असताना पालिकेच्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे.माझे अंक लेखन,मराठी अक्षर ओळख,गमतीच्या कलाक्रती आणि अआई व सामान्यझान हि चार पुस्तके विद्यार्थ्यांना अतिविलंबाने देण्यात आली असून वर्षाच्या पहिल्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत ती मिळणे अपेक्षित होते.पण,वर्षाच्या शेवटी ती मिळाल्याने शिक्षक,विद्यार्थी व पालक चक्रावून गेले आहेत.
२ फेब्रुवारी रोजी हि पुस्तके स्विकारल्याची नोंद शाळांमध्ये मिळाली असून,पँटर्न अँक्टीव्हिटी बुक ३,अंक ओळख मराठी,अल्फाबेट एन राएम्स,बालगीते व अक्षर ओळख (मराठी) अशी सहा पुस्तके असलेले २४ नोव्हेंबर २०१५ रोजीचे चलन ठेकेदाराने शाळांना दिले आहे.त्यामुळे सहा पुस्तके असताना विद्यार्थ्यांना चारच पुस्तके कशी मिळाली असाही संभ्रम पालकांत पसरला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पालिका प्रशासन कोणताही विचार करत नसल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाने संबधित ठेकेदारावर कडक कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेटे यांनी केली आहे.