महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 (3 व 4) अन्वये स्थायी समितीचे 8 सदस्य दि. 1 मे 2016 रोजी मध्यान्ही निवृत्त होत असून त्यांच्या जागी आज सर्वसाधारण सभेमध्ये श्री. अशोक गुरखे, श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. संगिता पाटील, श्रीम. छाया म्हात्रे, श्री. लक्ष्मिकांत पाटील, श्री. प्रशांत पाटील, श्रीम. मिरा पाटील, श्री. दिपक पवार यांची नामनिर्देशनाव्दारे स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याचे घोषित करीत महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर स्थायी समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, सभागृह नेता श्री. जयवंत सुतार, शिवसेनापक्ष प्रतोद नगरसेवक श्री. व्दारकानाथ भोईर उपस्थित होते.त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या प्रभाग क्र. 6 यादवनगर पोटनिवडणूकीतील विजयी उमेदवार श्रीम. संध्या यादव यांचेही महापौर श्री. सुधाकर सोनवणे व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.